खोका शॉप बांधू शकत नाही... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खोका शॉप बांधू शकत नाही...

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरात विस्थापित टपरी धारकांना खोका शॉप मिळावेत यासाठी अनेक आंदोलन सुरु आहे यापार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेचे नगर...

 कोपरगाव(वेबटीम)


कोपरगाव शहरात विस्थापित टपरी धारकांना खोका शॉप मिळावेत यासाठी अनेक आंदोलन सुरु आहे यापार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२० रोजी पत्रकार परिषद घेवून खोका शॉप संदर्भात खुलासा केला आहे.

 पत्रकार परिषदेत वहाडणे यांनी सांगितले आहे कि ज्यांचे व्यवसाय चालू आहे.स्वत:चे बंगले गाड्या आहेत अशांनी स्वताहून विस्थापितांच्या यादीतून आपले नाव कमी करावे कोपरगाव नगरपालिकेच्या ह्काच्या असणाऱ्या  बाजारतळ येथील जागेत जवळपास ८० खोका शॉप बांधून देणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

 तसेच मी नगराध्यक्ष झाल्यावर विस्थापितांसाठीधारणगाव रोड वरील जागेत  खोका शॉप व्हावे यासाठी दोनवेळा निविदा काढल्या मात्र निविदा कोणीही न भरल्यामुळे खोका शॉप झाले नाही आणि नंतरच्या काळात त्याठिकाणी स्थानिक रहिवास उच्च न्यायालयात गेल्यामुळे त्याठिकाणी आपण कुठल्याही परिस्थितीत खोका शोप करू शकत नाही  अशी आज परिस्थिती असल्याचे वहाडणे म्हणाले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत