खरंतर काँग्रेस पक्षाला विरोधात बसायचे होते... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खरंतर काँग्रेस पक्षाला विरोधात बसायचे होते...

देवळाली प्रवरा(वेबटीम)              खरं तर काँग्रेस पक्षाला विरोधात बसायचे होते. परंतू सत्ताधारी झालो. सत्ता ताब्यात आल्यावर विकास कामाचा वे...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

             खरं तर काँग्रेस पक्षाला विरोधात बसायचे होते. परंतू सत्ताधारी झालो. सत्ता ताब्यात आल्यावर विकास कामाचा वेग धरला पण कोरोना आडवा आला. राज्याची आर्थिकस्थिती नाजुक आहे.विकास कामाला निधी मिळत नाही. असे प्रतिपादन श्रीरामपूर मतदार संघाचे आ. लहू कानडे यांनी केले आहे. 

                दवणगाव ता.राहुरी येथील  चारी नंबर एक रस्ता खडीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी आमदार लहुजी कानडे बोलत होते. यावेळी  करणदादा ससाणे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, इंद्रभान पाटील थोरात, अंकुशराव कानडे, माजी नगराध्यक्ष  बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब खांदे, वैभव गिरमे,आण्णासाहेब पागिरे, निवृत्ती खपके, शंकरराव साळुंके, कुंडलिक खपके, दादा महाडीक, सुनील खपके, शंकर साळुंके, शिवाजी होन, भाऊ मोहटे, सयाराम जराड,मधुकर गिरमे, गोविंद होन,आबासाहेब जऱ्हाड  ,सुदाम पागिरे, अनिल खपके, भाऊ खपके, नंदकुमार खपके आदी उपस्थित होते. 

               यावेळी आ.कानडे बोलताना म्हणाले की, काँग्रेस पक्षाला सत्तेत सामिल व्हायचे नव्हते. परंतु सत्तेत सामिल व्हावे लागले. काँग्रेस पक्षाला विरोधात बसण्यास रस होता. आता सत्तेत आलो हा योगायोग आहे. विकास कामाचा वेग वाढवायचा होता. परंतू  कोरोना आडवा आला. निसर्गा पुढे कोणाचे चालत नाही.राज्याची आर्थिक स्थिती वाईट असल्याने विकास कामाला निधी मिळत नाही. त्यामुळे विकास कामावर मर्यादा येणार आहेत. तरीही प्रत्येक गावात एक तरी विकास कामे करु असे आश्वासन यावेळी आ.कानडे यांनी दिले.

           यावेळी करण ससाणे, सचिन गुजर, बाळासाहेब चव्हाण आदींचे भाषणे झाली. आभार कुंडलिक खपके यांनी मानले.सूत्रसंचालन वैभव गिरमे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत