आम्ही मंजुर केलेल्या ट्रान्सफार्मरचे उद्घाटन मंञी करत आहे... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आम्ही मंजुर केलेल्या ट्रान्सफार्मरचे उद्घाटन मंञी करत आहे...

  वळण(प्रतिनिधी)    आमच्या काळात मंजुर झालेल्या ट्रान्सफार्मर चे  आता मंञी उद्धघाटन करत फिरत आहेत ,आत्ता पर्यंत राज्यात मंञ्यांकडुन ट्रान्सफ...

 वळण(प्रतिनिधी)

   आमच्या काळात मंजुर झालेल्या ट्रान्सफार्मर चे  आता मंञी उद्धघाटन करत फिरत आहेत ,आत्ता पर्यंत राज्यात मंञ्यांकडुन ट्रान्सफार्मर चे उद्घाटन होताना पाहीले नव्हते पण उद्धघाटन करण्यासाठी यांच्याकडे काहीतरी उरले नाही म्हणून ते ट्रान्सफार्मर चे उद्घाटन करत फिरत आहेत हे हास्यास्पद असल्याची टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांच्यावर केली आहे.ते तांदुळवाडी (ता.राहुरी) येथे बोलत होते.

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे जिल्हा बॅंकेच्या सहकार्याने सेवा संस्थेच्या वतीने शेतक-यांना पशुधनासाठी ४५ लाख रूपये कर्ज वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन शिवाजी खडेकेवहे होते तर व्यासपीठावर भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भनगडे,किशोर वने,उत्तम म्हसे,रविंद्र म्हसे,शहजी सुरेश बानाकर,पञकार विनीत धसाळ हे होते.

     कर्डिले पुढे म्हणाले की, राहुरी तालुक्यात पोलिस खात्यांचा सर्वसामान्य लोकांना ञास सुरू आहे ,आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे नाटे-गुन्हे दाखल करून कोठडीत डांबुन ठेवण्याचे प्रकार सुरू झालेत लोकांची अडवून करण्याची मंञी तनपुरेंच्या वडीलांची परंपरा मुलाने कायम ठेवली  त्यामुळे आम्हाला आता आमचे हत्यार बाहेर काढावे लागेल. कर्डिले निवडणुकीत पडले आणि राज्यात सरकारन नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर हे डोक्यातून काढुन टाका कर्डिलेंचे आज हि अधिका-यांकडे तितकचं वजन आहे ,जेवढ वजन तुम्ही मंञी असुनही तुमच  अधिका-यांडे नाही अशी घनाघाती टिका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरेंवर केली आहे. कार्यक्रम प्रसंगी या प्रसंगी  शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष साहेबराव तोडमल,दिलीप भालसिंग,नितीन उदमले,अनिल लांडगे उत्तम म्हसे, किशोर वने,दादा पाटील सोनवने,राजेंद्र उंडे,शहाजी ठाकुर, अनिल आढाव,सिताराम ढोकणे,अजित डावखर,गणेश खैरे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत