वळण(गोविंद फुणगे) राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याला शासनाने परवानगी दिली त्यानुसार राहुरी तालुक्यातील काल दि.२३ नोव...
वळण(गोविंद फुणगे)
राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याला शासनाने परवानगी दिली त्यानुसार राहुरी तालुक्यातील काल दि.२३ नोव्हेंबर पासुन सुरु शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीत शाळा सुरू करण्या बाबत पालकांनी आरोग्य संदर्भात बाब दर्शवुन शाळा सुरू करण्याबाबद नकार घंटा दर्शवलीने विद्यार्थींमधे पुन्हा एकादा निराशा परसली आहे.
राहूरी तालुक्यात ६२ शाळांपैकी १२ शाळा माञ सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी सुरेश सुर्यवंशी यांनी दिली आहे.तर शाळा सुरू करण्यापूर्वीच शालेय प्रशासनाकडुन सर्व खबरदारीच्या उपाय योजना म्हणून थर्मामीटर, सॅटीट्यझर,मास्क तसेच वारंवार हात धुण्यासाठी स्वतंञ व्यवस्था देखील करण्यात आली होती.विद्यार्थी देखील शाळेत हजर झाले होते.परंतु आता शासनाने विद्यार्थीच्या आरोग्याची हमी घ्यावी अशी मागणी पालकांनी केल्याने माञ आता बहुतांशी शाळा सुरू रहातील नाही यात माञ साशंकता निर्माण झाली आहे.
राहुरी विकास गटात इयत्ता नववी ते बारावीच्या 62 शाळा आहेत २२ नोव्हेंबर अखेर ९७८ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी ४७८ कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट पूर्ण झाल्या आहेत त्यात ५ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. तर काल तालुक्यातील १२ सुरू करण्यात आल्या आहेत.तर खबरदारी म्हणून शालेय स्वच्छता व निर्जंतुकीकरण, शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट,विद्यार्थी बैठक व्यवस्था नियोजन ,शारीरिक अंतराच्या नियमांची अंमलबजावणीबाबत पूर्वतयारी ,शाळेतील कार्यक्रम आयोजनावर निर्बंध घालणे.पालकांची संमती घेणे आदींच्या खबरदारी घेण्यात आली आहे.;-सुनिल सुर्यवंशी,गट शिक्षण अधिकारी,पंचायत समिती राहुरी.
कोरोना ची दुसरी लाट येणार हे सांगत असुन हि शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तरी हरकत नाही माञ शालेय विद्यार्थ्यांना कोरणाची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराची हमी शासनाने घ्यावी अशी शाळा सुरू कराव्यात.;-,प्रकाश म्हसे, पालक
शालेय स्तरावर शासनाच्या आदेशानुसार सर्व तयारी झालेली असून पालकांची संमती मिळाल्यावर शाळा सुरू करू.:- शिवाजी म्हसे, विठ्ठल माध्यमीक विद्यालय आरडगाव
गेल्या आठ महिन्यापासून शाळा बंद असल्याने घरी बसुन करमत नाही तसेच ऑनलाइन शिक्षण शिक्षणामुळे अनेकांची मोबाइल घेण्याची देखील परिस्थिती नव्हती तसं काही काळ मोबाईल होते तो मोबाईल नेटवर्क मिळत नव्हतं शिवाय ऑनलाईन शिक्षकांने पुर्ण पणे ते शिक्षण अवगवत देखील होत नव्हत,कोरोची भिती आहेच तरीपण शाळा सुरू व्हाव्यात.;- तेजस्विनी खुळे विद्यार्थिनी इयत्ता नववी
शासनाच्या आदेशाप्रमाणे विद्यालयांनी निर्जंतुकीकरण करणे,व इतर सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत,सर्व मुख्याध्यापक,शिक्षक व कर्मचारी शाळेत हजर आहेत,परंतू कोरोना लाट येण्याच्या शक्यतेमुळे पालकांच्या मनात भीती निर्माण झालेली असून,पालक मुले शाळेत पाठवण्यासाठी द्विधा मनस्थितीत आहेत,त्यामुळे सध्यातरी पालक मुलांना शाळेत पाठविण्यास उत्सुक नाहीत ;- रविंद्र आढाव ,मा. उपसभापती तथा सदस्य पंचायत समिती राहुरी


कोणत्याही टिप्पण्या नाहीत