कोपरगाव(वेबटीम) रस्त्याच्या कडेला धोकादायक वळण व ठिकाणची माहिती देण्यासाठी उभे केलेले फलक अपघात ग्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच...
कोपरगाव(वेबटीम)
रस्त्याच्या कडेला धोकादायक वळण व ठिकाणची माहिती देण्यासाठी उभे केलेले फलक अपघात ग्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षा मुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे हे बोर्ड त्वरित बसवून द्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केली आहे.
रस्त्याची दुरुस्ती करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने रस्त्याच्या कडेला धोकादायक वळण,पूल, स्पीड ब्रेकर,आदी विविध दिशादर्शक फलक लावले जातात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फक्त नावालाच हे बोर्ड लावले जात असून या बोर्डाची वेळोवेळी दुरुस्ती करणे आवश्यक असते मात्र अशा प्रकारे लावलेल्या बोर्डाचे पुढे काय होते हे बोर्ड लावले जातात की आणखी कुठे जातात हा संशोधनाचा विषय आहे.
तसेच या सर्व रस्त्यावर विविध ठिकाणी रेडियम लावून वळण व इतर माहिती देणारे रिफ्लेक्टर लावले जातात मात्र कोपरगाव तालुक्यातील बऱ्याच रस्त्यावर असे रिफ्लेक्टर दिसत नाही
कोपरगाव - कोळपेवाडी रस्त्यावरील असाच एक बोर्ड अपघात होऊ नये म्हणून अपघाताची जागा व अरुंद पुलाची माहिती देणारा फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने बोर्ड लावलेला होता मात्र सदर बोर्ड अपघात ग्रस्त झाला असून या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याच अधिकाऱ्यांचे लक्ष गेले अगर जात नाही
गेल्या पाच सहा वर्षात सदर रस्त्याचे दोन वेळा डांबरीकरण झाले मात्र अपघाताची माहिती देणारे बोर्ड लावले नाही अगर त्या कडे लक्ष दिले जात नाही उलट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असून अपघाताला निमंत्रण दिले जात आहे असे या पत्रकात म्हटले असून या पत्रकावर घटनाकार मैत्री संघाचे गौतम बनसोडे, लोक स्वराज्य आंदोलनाचे सोमनाथ म्हस्के,किरण अढांगळे , राजू रोकडे, सुजल चंदनशिव आदींनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत