राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी तालुका फोटोग्राफर्स सामाजिक संस्थेच्यावतीने मयत सभासद संजय ताजने यांच्या कुटुंबाची १० लाख रुपयांच्या विमा ...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहूरी तालुका फोटोग्राफर्स सामाजिक संस्थेच्यावतीने मयत सभासद संजय ताजने यांच्या कुटुंबाची १० लाख रुपयांच्या विमा पॉलीसीचे वितरण करून सर्व सभासद बांधवांची विमा पॉलीसी काढून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
राहूरी तालुका फोटोग्राफर्स सामाजिक संस्था व्यवसायातील अडचणींबरोबर सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. संस्थेचे सभासद यांचे अपघाती निधन झाले असता त्यांचा १० लाख रुपयांचा विमा संस्थेकडून उतरविण्यात आला असतो त्या रकमेचा धनादेश सदर कुटुंबियांना राहूरी येथील रघुनंदन लॉन्स येथे कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आला.
प्रसंगी युनायटेड इंडियाचे विमा अधिकारी शिरीष कुलकर्णी व रघुनाथ शेलार यांच्या हस्ते पॉलिसीचे वितरण करण्यात आले. प्रास्तविकात बाळासाहेब मुसमाडे यांनी संघटनेने कोरोना काळात राबविलेल्या अनेक उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी विमा प्रतिनिधी रवींद्र म्हसे, शिरीष कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शरद पुजारी,भरत दिघे,प्रभाकर जाधव,सचिन गाढे,सतिश हरकले,महेश साळे, रवी शिंदे,भास्कर तनपुरे,वसंत पवार,मच्छिन्द्र विटनोर, बाबासाहेब कळमकर व बाबा जाधव यांची नूतन संचालक पदी निवड करण्यात आली. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष ईश्वर लहारे,अपणा टिके,कुलदीप नवले,आदिनाथ मुसमाडे,हरीश शेलार,भाऊसाहेब राजळे,भानुदास शेलार,राहुल पाचरने,निलेश भगत,नवनाथ बेंद्रे , गंगाधर गीते आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सतीश कोबरणे व राजेश मंचरे यांनी केले.आभार सचिव गणेश नेहे यांनी मानले.
आमची पण मदत घ्या हो...
फोटोग्राफर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मुसमाडे यांनी सामाजिक उपक्रम म्हणून रुग्णवाहिका अथवा वैकुंठरथ लोकार्पण करण्याची घोषणा करताच १० लाख रुपयांचा विमा प्राप्त झालेल्या ताजने कुटूंबियांनी या कार्यास आमचा हातभार म्हणून १ लाख ३१ हजार रुपये विमाच्या मंजूर रकमेतून देण्याचे कबूल केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत