कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शिवसेना व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने शहरात बांधकाम सुरू असलेल्या बस स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा आतील...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शिवसेना व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने शहरात बांधकाम सुरू असलेल्या बस स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा आतील बाजूस परिसरातील धार्मिक स्थळाची माहिती देणारी चित्ररूपी माहिती देणारे फलक लावावे अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना एस टी महामंडळाचे कोपरगाव आगार प्रमुख अभिजित चौधरी यांचा मार्फत देण्यात आले.
या निवेदनावर कोपरगांव शिवसेना संपर्क प्रमुख मनोज कपोते , मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनिल फंड ,संदीप दळवी,राजेंद खंडागळे मनोज विसपुते विनायक खंडागळें शिवनारायण परदेशी शेखर जाधव रमेश टोरपे आदींच्या उपस्थित दिले. याप्रंसगी राज्य परीवहन सेनेचे किरण बिडवे हेही उपस्थति होते.
कोपरगाव नव्याने बांधकाम सुरू असलेल्या बस स्थानकाचे काम आता पूर्णत्वास आले असून त्यास रंगकाम करते वेळी परिसरातील काचेश्वर, शुकलेश्वर, जनार्धन स्वामी, साई तपोभूमी, साई धाम, संजीवनी पार, दत्त पार, जुनी गंगा, हिंगणी वाडा आदी ऐतिहासिक स्थळाची माहिती देणारे चित्ररूपी माहिती देणारे फलक बस स्थानकात लावाव्या.
ज्या मुळे परिसरातील धार्मिक स्थळाची माहिती प्रवाशांन पर्यंत पोहचेल जेणे करून पर्यटन व्यवसाय वाढण्यास चालना मिळेल आणि त्यामुळे कोपरगाव च्या बाजार पेठेस उर्जितावस्था प्राप्त होण्यास मदत होईल असे निवेदन देण्यात आले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत