वळण(गोविंद फुणगे) तीन वर्षाच्या पाठपुराअंती आता पंचायत समिती सदस्यांना विकासकामे करण्यासाठी १५ वित्त आयोगामधे १० टक्के निधीची तरतुद करण्या...
वळण(गोविंद फुणगे)
तीन वर्षाच्या पाठपुराअंती आता पंचायत समिती सदस्यांना विकासकामे करण्यासाठी १५ वित्त आयोगामधे १० टक्के निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे आता आरडगाव गणांमधील दहा गावांधे विकास कामे करणाचा मानस असल्याच पंचायत समिती सदस्य रविंद्र आढाव यांनी सांगितले आहे.ते राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे बोलत होते.
राहुरी पंचायत समिती अंतर्गत आरडगाव येथे "आमचा गाव आमचा विकास" या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर पुढील पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याबाबत आरडगाव गणांमधील सरपंच, ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका यांची संयुक्त कार्यशाळा संपन्न झाली आहे. यामधे पाणीपुरवठा ,स्वच्छता, हागणदारीमुक्त गाव, छत पाणी संकलन, सौर ऊर्जा प्रकल्प, शिक्षण, आरोग्य आदिंसह विविध विकास कामांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.तर येणा-या समस्यांबाबद देखील समस्यांचे निराकरण करूण सुचना करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरडगाव चे सरपंच कर्णा हे होते तर प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती चे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे गटनेते रविंद्र आढाव, विस्तार अधिकारी संजय राठोड होते.याप्रसंगी राठोड यांनी उपस्थितांना विकास कामाच्या आराखड्याबद्दल मार्गदर्शन करून विविध सुचना देखील केल्या आहेत .
यावेळी मानोरीचे सरपंच अब्बास शेख, भाऊ झुगे,ग्राम विकास अधिकारी किसन भिंगारदे, भाऊसाहेब राशिनकर, संतोष राठोड, स्नेहल भागवत, दिलीप बर्डे, सुरेश डोंगरे, अण्णासाहेब तोडमल, बापूजी टेकाळे ,गोरक्षनाथ गुंड, शामराव आढाव,संदीप जेऊघाले,सीमा जगताप, प्रमिला झुगे,अंजना आढाव,सरस्वती दरंदले,सुनंदा खुळे, रोहिणी ठुबे, बापूजी टेकाळे, संदीप जेऊघाले, दत्तात्रय म्हसे, हरिभाऊ आचपळे, प्रकाश भांड, नारायण तुवर तसेच ग्रामपंचत पदाधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत