अकोले प्रतिनिधी अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन बेड सह इतर सुविधानियुक्त शासकीय कोविड रुग्णालय आज अधिकृत सुरु झाले आहे. ...
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन बेड सह इतर सुविधानियुक्त शासकीय कोविड रुग्णालय आज अधिकृत सुरु झाले आहे.
अकोले तालुक्यात शासकीय खानापुर कोविड सेंटर व अगस्ती कारखान्याचे वतिने सुरु केलेल विठ्ठल मंगल कार्यालयातील कोविड सेंटर सुरु आहे .तेथे कोरोना तपासणी व प्राथमिक उपचार केले जातात माञ रूग्णाची प्रकृती अधिक असल्यास त्यावर उपचार व ॲक्सीजन बेडची गरज असल्यास त्यांना संगमनेर येथील शासकीय अथवा खाजगी रूग्णालयात जावे लागत असे. माञ काही दिवसांपूर्वी शहरातील डॅा.मारूती भांडकोळी यांनी आपले हरिश्चंद्र रूग्णालयातील वरच्या मजल्यावरील २५ बेड ही शासकीय कोविड उपचारासाठी देण्याची तयारी दर्शवली व त्यानुसार उदघाटनही झाले होते.
माञ त्या रुग्णालयासाठी लागणारी साहित्य ,औषधे,डॅाक्टरर्स, सफाई कर्मचारी सह इतर स्टाफ यांची उपलब्धता शासकीय स्तरावर करण्यात आली त्यामध्ये रोटरी क्लब व इतर समाजसेवी संस्था यांनी मदत केल्याने आज शुक्रवार दि २७ नोव्हेंबर २०२० रोजी हरिश्चंद्र रूग्णालयात शासकीय कोविड रुग्णालय सुरु करुन या रूग्णालयात ०८ रुग्णही ॲडमिट करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री मुकेश कांबळे,अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॅा.संजय घोगरे,तालुका आरोग्य अधिकारी डॅा.इंद्रजित गंभिरे,डॅा.बाळासाहेब मेहेञे, डॅा.श्याम शेटे,डॅा.मारुती भांडकोळी सह इतर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत