उंबरे ः वेबटीम उंबरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधार्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांनी जुन्या-नव्यांची मोट बांधल्याने मोठी ...
उंबरे ः वेबटीम
उंबरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधार्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांनी जुन्या-नव्यांची मोट बांधल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रतिष्ठेच्या या महायुद्धात सत्ताधारी गटाचे नेते तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे यांच्या सौभाग्यवती रतनबाई ढोकणे व सुपुत्र सचिन नामदेव ढोकणे यांनी आज आपले अर्ज दाखल केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
उंबरेत सत्ताधारी गटाचे नेतृत्व तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, सुनिल आडसुरे हे करत आहेत. तर विरोधी गटाचे नेतृत्व साहेबराव दुशिंग व गंगाधर दादा, गोरक्षनाथ दुशिंग, कारभारी ढोकणे, प्रा रामकृष्ण ढोकणे, कैलास अडसुरे, विलासराव ढोकणे, अशोक ढोकणे करत आहेत. याशिवाय छत्रपती प्रतिष्ठाण, शिवसेना आणि भाजपाचाही एक गट या ग्रामविकास आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून सत्ताधार्यांकडून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याची व्यूहरचना सुरू असून विरोधी गटातूनही सत्ताधार्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावून या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्याची प्रतिज्ञा केली जात आहे. जनतेतूनही सुप्त लाट असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
त्यात प्रभाग क्रमांक पाच या प्रतिष्ठेच्या बालेकिल्ल्यात नामदेवराव ढोकणे यांच्या पत्नी रतनबाई ढोकणे यांनी ओबीसी महिला आणि जनरल महिला असे अर्ज भरले आहेत. याशिवाय पूनम गोरे आणि वनिता तरवडे यांचे महिला उमेदवार म्हणून अर्ज आहेत. तर सुपुत्र सचिन ढोकणे यांनी जनरलमधून अर्ज भरला असून त्यांच्याशिवाय उपसरपंच दत्तात्रय तरवडे, युवानेते संजय आडसुरे, बाबासाहेब ढोकणे, नानाखंडू ढोकणे यांचे अर्ज दाखल आहेत.
दरम्यान, काल दिवसभर दोन्ही गटाकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत पाच प्रभागात 15 जागांसाठी 42 अर्ज आले आहेत.
प्रभाग क्रमांक 1
रावसाहेब ढोकणे, अशोक दुशिंग, विकास गरूड, सुवर्णा गरूड, रंजना सुर्यभान ढोकणे, नाना खंडू ढोकणे, राणी विकास दुशिंग, विकास दुशिंग, बापूसाहेब दुशिंग, गयाबाई ढोकणे, सारिका ढोकणे, मारूती ढोकणे,
प्रभाग क्रमांक 2
श्रीकृष्ण अशोक ढोकणे, कैलास आडसुरे, भाऊसाहेब साबळे, गंगाधर आडसुरे, पंढरीनाथ साबळे, प्रमिला आण्णासाहेब ढोकणे,
प्रभाग क्रमांक 3
सचिन नामदेव ढोकणे, दत्तात्रय तरवडे, कैलास खंडागळे, आदिनाथ पटारे, राहुल वैरागर, दीपक पंडीत, साहेबराव गायकवाड, सुवर्णा पंडीत, लता वैरागर
प्रभाग क्रमांक 4
किशोर शिरसाठ, सीमा दारकुंडे, दारकुंडे सुमन, ज्योती ढोकणे, योगेश आप्पासाहेब ढोकणे,
प्रभाग क्रमांक 5
रतनबाई नामदेव ढोकणे, सचिन नामदेव ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, नाना खंडू ढोकणे, दत्तात्रय तरवडे, वनिता ज्ञानेश्वर तरवडे, संजय आडसुरे, पूनम बाबासाहेब गोरे,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत