कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहराला सध्या ६ दिवसाआड पाणी पुरवठा होतो. पालीकेकडे पाणी साठवण क्षमता कमी असल्याने पाण्याचा गंभिर प्रश्न कायमस्वर...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहराला सध्या ६ दिवसाआड पाणी पुरवठा होतो. पालीकेकडे पाणी साठवण क्षमता कमी असल्याने पाण्याचा गंभिर प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी १०५ कोटी रूपयांचा नवा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर काँक्रिटीकरण (अंदाजे खर्च १८ लाख ५३ हजार) व प्रभाग क्रमांक सहा मधील नाथाभाऊ घर ते राममंदिरापर्यंत डांबरीकरण करणे (अंदाजे खर्च (२१ लाख १९ हजार) या कामांचा मंगळवार (दि.२९) शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे,मेहमुद सय्यद, संदीप पगारे, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा शिंगाडे, उद्योजक कैलास ठोळे, चंद्रकांत अजमेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल गंगुले, शिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडियाल, भरत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारुन कामाचा शुभारंभ करण्यात आला.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासुन शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील एस. जी. प्राथमिक शाळेसमोरील रस्त्याचे काम झाले नाही त्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केल्याचे समाधान आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की, आमदार आशुतोष काळे आमदार झाल्या पासुन नव्हे तर मी जसा नगराध्यक्ष झालो तेव्हापासून शहराच्या विकास कामात पुर्ण सहकार्य करीत आहेत. म्हणुनच गेल्या १० वर्षात जितके कामे झाले नसतील त्यापेक्षा अधिक कामे ४ वर्षात झाली. यापुढेही कोट्यावधी रुपयांची कामे होणार आहेत. निवडणूकीत जरुर राजकारण करावे मात्र शहर विकासात राजकारण करु नका असा सल्ला विरोधकांना दिला.
यावेळी यावेळी सुनिल गंगुले, मंदार पहाडे, प्रतिभा शिलेदार, मेहमुद सय्यद, कलविंदर दडियाल यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कैलासशेठ ठोळे, चंद्रकांतशेठ ठोळे, दिलीपशेठ अजमेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियाल, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभाताई शिलेदार, हाजी मेहमूद सय्यद, सौ. वर्षाताई शिंगाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, विद्यार्थी अध्यक्ष स्वप्नील पवार, डॉ. अमोल अजमेरे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकिरमामु कुरेशी, भरत मोरे, सुनील बोरा, बाळासाहेब रुईकर, राहुल देवळालीकर, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, विजय नागरे, संतोष टोरपे, राजेंद्र जोशी, समीर वर्पे, लक्ष्मण सताळे, प्रफुल्ल शिंगाडे, विजय बंब, मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड, वाल्मिक लहिरे, निखिल डांगे, इम्तियाज अत्तार, रावसाहेब साठे, विजय त्रिभुवन, रामदास खैरे, जनार्दन केकाण, अरविंद पटेल, चंद्रकांत कासलीवाल, भाऊसाहेब लोहकरे, अखिल चोपदार, तिलकशेठ अरोरा, गुलशनशेठ होडे, रवींद्र देवरे, मच्छिन्द्र टेके, गणेश लकारे, प्रफुल्ल शिंगाडे, बाला गंगूले, विजय त्रिभुवन, अंबालाल पोरवाल, श्रीकांत राठी, राजेंद्र लोढे, मुन्ना मन्सूरी, सलिम चोपदार, प्रवीण शेलार, भूषण पाटणकर, विजय दाभाडे, दीपक देशमुख, शुभम दुशिंग, नितीन शिंदे, रशीदभाई शेख, बिलाल पठाण आदी उपस्थित होते. यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंलन माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी केले.
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न, विमानतळासाठी ३०० कोटी व कोपरगाव शहराचे महत्वाचे प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी अल्पकाळातच मार्गी लावले याबद्दल त्यांच्या कार्यशैलीचे कौतूक करून कोपरगाव शहरातील विकास कामाचा जो सपाटा सुरू आहे तो अविरत सुरू ठेवावा अशी आशा व्यक्त करीत पाटपाण्याचे योग्य नियोजन केल्या बद्दल आमदार काळे यांचे उद्योजक कैलास ठोळे अभिनंदन केले
कोपरगाव शहराच्या विकासात खीळ घालणाऱ्यांना कोपरगावच्या जनतेने सत्तेपासून खड्यासारखे दूर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या आमदार आशुतोष काळे यांना निवडून दिले - नगराध्यक्ष विजयराव वहाडणे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत