राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी फॅक्टरी येथे आज दिनांक २९ डिसेंबर रोजी माजी आमदार भानुदास मुरकुटे व शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यां...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहूरी फॅक्टरी येथे आज दिनांक २९ डिसेंबर रोजी माजी आमदार भानुदास मुरकुटे व शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी सोबत सायकल चालवत आनंद लुटला.
डॉ.शेकोकार यांनी राहूरी फॅक्टरी येथे नव्याने राहूरी सायकल अँड स्पोर्ट वर्ल्डचे उदघाटन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेल्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना सायकल चालविण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी सायकल हातात घेऊन सेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्याकडेही एक सायकल सोपवत चला माझ्या सोबत अस म्हणून वृंदावन कॉलनी परिसरात फेरफटका मारला. यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत