उंबरे : वेबटीम मी कामापेक्षा विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देत नाही. उलट विरोधकांमुळे माझ्या शरीरात आणखी प्रखर उर्जा निर्माण होते. या उर्जेच्...
उंबरे : वेबटीम
मी कामापेक्षा विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देत नाही. उलट विरोधकांमुळे माझ्या शरीरात आणखी प्रखर उर्जा निर्माण होते. या उर्जेच्या जोरावर आता मी उंबरे माळवाडी प्रभाग क्रमांक 3 मधून पुन्हा निवडणूक लढविणार आहे. मी पाच वर्षात प्रभागात केलेली कामे घेवून जनतेसमोर जाणार असल्याने या कामांची पावती म्हणून नक्कीच माझ्या वार्डातील जनता मला दुसर्यांदा निवडून देईल, असा विश्वास ग्रामपंचायत सदस्य दीपकराव पंडीत यांनी व्यकत केला.
गेल्या पाच वर्षात माझ्याकडून अपेक्षित कामे झाली नसतील मात्र मी प्रामाणिकपणे माळवाडीचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. या भागात झालेले रस्ते, गटारी, शाळा नुतनीकरण, घरकुल इत्यादी प्रश्नांवर मी काम केलेले आहे. आता येणार्या काळात माळवाडी मॉडेल बनवून मी येथील जनतेचे पाणी व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावणार आहे. त्यासाठी गावातील वडीलधार्या माणसांचे मार्गदर्शन घेवून आपला एक अजेंडा मी जनतेसमोर मांडणार आहे. मी पाच वर्षात केलेली कामे व येणार्या पाच वर्षात हाती घेतलेली कामे जनतेसमोर मांडल्यानंतर माझी जनता मला नक्कीच आपला सदस्य म्हणून संधी देईल, असा विश्वास पंडीत यांनी व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत