पानेगावात बाळासाहेब नवगिरे यांचे शेतातच उपोषण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पानेगावात बाळासाहेब नवगिरे यांचे शेतातच उपोषण

नेवासा(प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील पानेगाव शिवारात असलेल्या वडिलोपार्जित शेतात  सातत्याने होणारे अतिक्रमण व शेतपीक घेण्यास अडचणीमुळे  त्रस...

नेवासा(प्रतिनिधी)

नेवासा तालुक्यातील पानेगाव शिवारात असलेल्या वडिलोपार्जित शेतात  सातत्याने होणारे अतिक्रमण व शेतपीक घेण्यास अडचणीमुळे  त्रस्त झालेले शेतकरी व पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी चक्क शेतातच उपोषण केले.


पानेगाव येथील शेतकरी व पत्रकार बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे यांची पानेगाव शिवारात गट नंबर 220/1 ब मध्ये दोन एकर अकरा गुंठे शेतजमिन आहे.अकरा वर्षापासून ते वडिलोपार्जित शेतात पीक घेत असून ते आपला परीवार व मजूरासह कपाशी पीकाची मशागत करत असताना 8 डिसेंबर रोजी गावातीलच सात ते आठ जणांनी दमदाटी व शिवीगाळ करुन मजूरांना पळवून लावले.मागील महिन्यात त्याच लोकांनी माझ्या शेतात रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता असे नवगिरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शनिवार दि.12डिसेंबर रोजी त्यांनी या विरोधात व न्याय मिळावा म्हणून शेतातच आमरण उपोषण सुरू केले होते. 

उपोषणस्थळी पानेगावचे लोकनियुक्त सरपंच संजय जंगले,तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रेय घोलप,पत्रकार एकता संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर,माजी अध्यक्ष विनायक दरंदले,पत्रकार सुनिल गर्जे,चंद्रकांत दरंदले,पोलिस पाटील बाबासाहेब जंगले,उपसरपंच रामभाऊ जंगले,किशोर जंगले यांनी भेट देवून चर्चा केली.

 यबाबद माहिती देतांना श्री.नवगिरे म्हणाले की,माझ्याच शेतात पीक घेण्यास अडचण येवू लागल्याने मी सोनई पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. मात्र तरीही त्रास सुरुच असल्याने आज मला शेतातच आमरण उपोषण करावे लागत आहे.मुख्यमंत्री,महसूलमंत्री यांचे सह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेले आहेत.

दरम्यान संबंधित व्यक्तींवर योग्य कारवाई करणेत येईल.पुन्हा आडकाठी दांडगाई,मज्जाव केल्यास कारवाई करण्याचे आश्वादन  देण्यात आल्याने  लिंबू पाणी देवून उपोषण सोडविण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत