उंबरे : ,वेबटीम गावातील गोरगरिबांना शासकीय कामात मदत मिळवून देण्यात मी सर्वात पुढे असतो, मी कधीही फळाची अपेक्षा केली नाही, निःस्वार्थीप...
उंबरे : ,वेबटीम
गावातील गोरगरिबांना शासकीय कामात मदत मिळवून देण्यात मी सर्वात पुढे असतो, मी कधीही फळाची अपेक्षा केली नाही, निःस्वार्थीपणे जनतेची सेवा करत आहे, त्याची पावती म्हणून मागच्या पंचवार्षिकला मला अपक्ष असताना 81 जणांनी मते दिली, आता गेल्या पाच वर्षातही मी अनेक कामे केली आहेत, त्यामुळे मला संधी मिळाल्यास नक्कीच जनता एक कामाचं पोरगं म्हणून मला निवडून देतील, असा विश्वास युवानेते गणेश गोरक्षनाथ ढोकणे यांनी व्यक्त केला.
गणेश ढोकणे म्हणाले, मी राजकारणापेक्षा समाजकरणाला जास्त महत्व देतो, त्यामुळेच कोणतेही पद नसताना मी जनतेची कामे करण्यात समाधान मानले, गेल्या पंचवार्षिकला मी प्रभाग पाच मधून अर्ज भरला होता, मात्र माझी उमेदवारी टाळली गेली, परंतु जनतेच्या आग्रहाखातर मला अपक्ष लढावे लागले, त्यात मतांसाठी पैशांचा पाऊस सुरू असतानाही जनतेने मला 81 मते देऊन माझ्यावरील प्रेम व्यक्त केले, त्यात माझा पराभव झाला असला तरी मी जनतेची कामे थांबवली नाही, पाच वर्षात मी आणखी जोरात तयारी केली, वार्डातील प्रत्येक घरात काहीतरी कामे करून माझी ओळख निर्माण केली आहे. या पाच वर्षात मी रेशन कार्ड, निराधार लाभ, दाखले अशी 500 पेक्षा अधिक लोकांची कामे मार्गी लावली आहेत, आता पहिली 81 मते आणि या पाच वर्षातील किमान 300 मते अशी माझी स्वतःची 381 मते आहेत, यापैकी मी 250 गृहीत धरून ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे, पार्टीने उमेदवारी दिली तर माझा विजय निश्चित असल्याचे गणेश म्हणाले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत