कोपरगाव नगरपालिका दुरुस्ती ऐवजी फिरवते खड्ड्यावर पाणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव नगरपालिका दुरुस्ती ऐवजी फिरवते खड्ड्यावर पाणी

  कोपरगाव(वेबटीम) गेल्या दोन महिन्यांपासून कोपरगाव नगर पालिका रस्ते दुरुस्ती ऐवजी रस्त्यावर पाणी फिरवून जनतेचा पैसा खड्ड्यात घालत आहे असे मत...

 कोपरगाव(वेबटीम)

गेल्या दोन महिन्यांपासून कोपरगाव नगर पालिका रस्ते दुरुस्ती ऐवजी रस्त्यावर पाणी फिरवून जनतेचा पैसा खड्ड्यात घालत आहे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

कोपरगाव नगर पालिकेत "ना खाऊगा ना खाने दुगा" हे घोष वाक्य घेऊन सत्तेत आलेल्या लोक नियुक्त नगराध्यक्ष यांच्या कार्यकाळाला चार वर्षे पूर्ण झाले कोपरगाव च्या जनतेला स्वच्छ व सुंदर रस्ते देण्याचे आश्वासन मिळाले मात्र हे रस्ते काही खड्डे मुक्त झाले नाही.


डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छ संभाजी महाराज स्मारक हा गावातील मुख्य रस्ता या रस्त्यावर मोठे खड्डे पडले नागरिकांनी मागणी केल्यावर हा रस्ता मुरूम टाकून बुजवला मात्र आता या मुरुमाची माती झाली असून हा रस्ता दुरुस्त करण्याऐवजी नगरपालिकेच्या वतीने या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रोज सकाळी संध्याकाळी ट्रॅकर द्वारे पाणी मारले जात आहे.

नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणी मारले जात असले तरी ह्या रस्त्यावर डांबरीकरण होणे अपेक्षित आहे मात्र एका बाजूला नागरिकांना नगर पालिका पाणी बचतीचा संदेश देत असते मात्र गेल्या दोन महिन्यात या रस्त्यावर पाणी मारून नगरपालिका या पाण्यावर पाण्यासारखा जनतेचा पैसा खर्च करत आहे .

पावसल्यामुळे डांबरी रस्ते करता येत नाही असे असले तरी कदाचित या रस्त्यावर पाण्यासारखा पैसे पाण्यावर खर्च करण्या पेक्षा एवढया पैशात हा रस्ता झाला असता मात्र जनतेचा हा पाण्यावर खर्च झालेला पैसा खड्ड्यात गेला हे मात्र निश्चित स्वच्छ सुंदर रस्ता तयार करण्यापूर्वी या रस्त्यावर पाणी मारून पाण्यासारखा पैसा कमावणे हा उद्देश असू शकतो मात्र नगर पालिकेने आता तरी या रस्त्याचे काम हातात घ्यावे असे या पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत