मुंबई : वेबटीम राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे ठोस आश्वासन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांन...
मुंबई : वेबटीम
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे ठोस आश्वासन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृवाखाली शिक्षण आयुक्त विशालजी सोळंकी यांचे समवेत बालचित्रवाणी कार्यालय पुणे येथे बैठक घेतली.
या प्रसंगी प्रामुख्याने केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे तात्काळ पदोन्नतीने भरणे,शिक्षण सेवकांचे मानधन सातवा वेतन आयोगाप्रमाणे एकवीस हजार रुपये करणे,आश्वासित प्रगती योजना अंतर्गत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे10:20:30प्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद,नगरपालिका प्राथमिक/ माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करणे,आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे सेवाजेष्ठता निकष सर्व जिल्ह्यात समान असावे,
कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती आजारांच्या यादीत कोविड-१९ व तापाच्या इतर आजारांचा यादीत समावेश करण्यात यावा,अप्रशिक्षित आणि वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरावी.,CMP प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन, वैद्यकीय बीले, अंतिम भविष्य निर्वाह निधी, अंतिम नापरतावा प्रकरणे सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करावी व शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बॅंकेकडुन प्राप्त SGSP अंतर्गत अपघात विषयक महत्वपूर्ण योजनेचा लाभ राज्यातील शिक्षकांना प्राप्त करून देणे व शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बॅंकेत वेळेवर व्हावेत,
शिक्षकाचे राज्यातील बिंदुनामावली ( रोस्टर) पूर्ण व्हावे, नंदुरबार जिल्ह्यात अपंग युनिट अंतर्गत भरती झालेल्या एक्केचाळीस शिक्षकांची मागील त्रेचाळीस महिन्यांपासून वेतन बंद आहे ते सुरू करण्यात यावे,मुख्याध्यापक पदोन्नती नाकारल्यामुळे चटोपाध्याय वेतनश्रेणी काढून घेण्यात आली आहे उदा: नंदुरबार ,औरंगाबाद सदर प्रकरणाची चौकशी व्हावी,सन २०१७-२०१८व २०१८- १९ साली जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील विस्थापित रॅन्डम पद्धतीने बदली झालेल्या महिला व पती-पत्नींना तीस किलोमीटरच्या आत विनाअट पदस्थापना मिळावी,राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा घटक मंडळाच्या शाळा शंभर टक्के निधी वेतनासाठी प्राप्त व्हावा,कोविड १९ मध्ये कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना रुपये पन्नास लाख रुपये विमासंरक्षण रक्कम तातडीने मिळावी,खंडपीठ व विभागीय आयुक्त यांच्या कडून न्याय मिळालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेने पदस्थापना द्यावी आदी विषयांवर शिक्षण आयुक्त विशालजी सोळंकी यांचेंशी सकारात्मक चर्चा झाली असता त्यांनी सदरचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येईल असे आश्वासित केले.
या प्रसंगी चर्चेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे,राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहकले गुरुजी,रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष संदेश पालकर,कोकण विभाग प्रतिनिधी मदन वानखेडे,अहमदनगर चे कार्यालयीन चिटणीस गणेश वाघ आदिंनी चर्चेत सहभाग घेतला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत