विष्णू सावरा यांच्या निधनाने उपेक्षित आदिवासी समाजाचा आधारवड हरपला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विष्णू सावरा यांच्या निधनाने उपेक्षित आदिवासी समाजाचा आधारवड हरपला

अकोले प्रतिनिधी भाजपचे जेष्ठ नेते,माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाल्याची वार्ता समजताच अकोले तालुक्यातील आदिवासी समाजामध...

अकोले प्रतिनिधी

भाजपचे जेष्ठ नेते,माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाल्याची वार्ता समजताच अकोले तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये दुःख झाले असून माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की, माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या दुःखद निधनामुळे अतिशय दुःख झाले. उपेक्षित आदिवासी माणसाचा आधारवड हरपला. माझ्यासोबत ६ टर्म व मी सातव्या वेळी आमदार झालो अतिशय मितभाषी असा माझा मित्र हरपला. त्याच्या निधनामुळे आदिवासी समाजाची मोठी हानी झाली त्यांनी आदिवासी समाजासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण होते आदिवासींच्या हितासाठी त्यांनी माझ्या सोबत अनेक आंदोलनात सहभाग नोदवला, त्यांच्या निधनाने आदिवासी समाजाची मोठी हानी झाली आहे .

    तर  माजी आमदार वैभवराव पिचड  म्हणाले की, माजी मंत्री आदरणीय विष्णु सावरा यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आदिवासी समाज नव्हे तर देशाची हानी झाली आहे .त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मला धक्का बसला.आदिवासी समाजाचा लढाऊ नेता हरपला. जनतेचे प्रश्न सोडवण्यात सदैव अग्रेसर राहिलेल्या सावरा यांनी पक्ष कार्यकर्ता म्हणून दीर्घकाळ सामाजिक कार्य केले. आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीअर्पण करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत