उंबरे ः वेबटीम उंबरेच्या राजकारणात दररोज नव-नवीन घडामोडी सुरू आहेत. त्यात प्रभाग क्रमांक एकमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. कारखान्याचे...
उंबरे ः वेबटीम उंबरेच्या राजकारणात दररोज नव-नवीन घडामोडी सुरू आहेत. त्यात प्रभाग क्रमांक एकमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. कारखान्याचे माजी संचालक इंजिनियर नवनाथ ढोकणे व इंजिनियर गोरक्षनाथ दुशिंग या दोन्ही ‘इंजिनियर’ यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या बनलेल्या या प्रभागात तुल्यबळ उमेदवार देवून कोणाचा गट बाजी मारणार ? याच्या गावात पैजा सुरू झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक एक म्हणजे सोयरे धायरे यांचे राजकारण असलेला वार्ड आहे. येथे कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे यांचे प्राबल्य आहे. तर माजी पंचायत समिती सदस्या संगिताताई दुशिंग व अभियंता गोरक्षनाथ दुशिंग यांचा हा घरचा वार्ड आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीत नवनाथ ढोकणे हे सत्ताधारी गटात आहेत. त्यामुळे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, कारखान्याचे माजी संचालक सुनिल आडसुरे तसेच भाजपाचे राजेंद्र ढोकणे यांचीही ताकद त्यांना मिळणार असल्याने या प्रभागात सत्ताधार्यांचे वजन वाढलेले दिसत आहे. त्यामुळे सत्ताधार्यांच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक एकमधील तीनही जागा जिंकण्याची फक्त औपचारीकता बाकी असल्याचे चित्र आहे.
या
उलट येथे इंजि. गोरक्षनाथ दुशिंग हे एकाकी किल्ला लढविताना दिसत आहे. त्यांच्याकडे काही बडे नेते नसले तरी मंडळाचे मार्गदर्शक कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग यांची साथ आहेच. शिवाय अन्य अनेक छुपे हातही मदतीला तयार असल्याने येथे धक्कादायक निकालाची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे दोन्ही इंजिनियरच्या दृष्टीने हा वार्ड प्रतिष्ठेचा बनला आहे. याशिवाय या वार्डातील ज्येष्ठ नेेते तथा नेहमीच किंगमेकर ठरणारे ‘गोरक्षनाथ ढोकणे’ ज्येष्ठ नेते कडू मामा, सूर्यभान नाना ढोकणे, कारभारी ढोकणे, छगनराव दुशिंग, लक्ष्मणतात्या ढोकणे, आणासाहेब गुंजाळ, आप्पासाहेब ढोकणे, मच्छिन्द्र ढोकणे, गोरक्षनाथ ढोकणे यांच्या भूमिकेवरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. दरम्यान, राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, त्यामुळे शेवटच्या क्षणी कदाचित विचार जुळल्यास हे दोघे इंजिनियर एकत्र दिसल्यास नवल वाटायला नको
या प्रभागात सध्या नानाखंडू ूढोकणे, बापुसाहेब दुशिंग़, सोपानकाका दुशिंग, विकास दुशिंग, प्रा. रामकृष्ण ढोकणे, विकास गरूड, गीताराम ढोकणे, रावसाहेब ढोकणे, संतोष ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, अनिल ढोकणे, गोरक्षनाथ देव्हारे, अशोकराव ढोकणे, बाळासाहेब ढोकणे, गणेश गडाख, रामभाऊ पिंपळे आदींच्या नावाची चर्चा असून कोण कुणाकडून उमेदवार करणार ? हे अर्ज भरल्यानंतरच समजणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत