कोपरगाव प्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड १९ लसीकरणासाठी तीन टप्यात मोहिम राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्म...
कोपरगाव प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड १९ लसीकरणासाठी तीन टप्यात मोहिम राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्या जोडीने पत्रकारांनी देखील जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीत पत्रकारांनी रात्रदिवस काम केलेले आहे. जवाबदारी घेवुन काम करत असतांना काही पत्रकारांना जीव देखील गमवावा लागला आहे. तर काही पत्रकार आजही कोरोना बाधित आहेत. पत्रकार देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून आजही काम करत आहे. लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात पत्रकारांचा देखील समावेश करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन प्रदेश अध्यक्ष वसंत मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगांव यांच्या वतीने कोपरगांव तहसलिदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाचा प्रसार कमी होत चालला असताना राज्यात लसीकरणाची तयारी सुरु आहे. राज्यात लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्यांचं टास्क फोर्सचं गठन करण्यात आलं आहे. तसेच, राज्य पातळीवर लसीकरण मोहिमेसाठी कंट्रोल रुमही तयार करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर अतिरिक्त आयुक्तांच्या अंतर्गत शहरांमधील टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलीय. स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत वॉर्ड टास्क फोर्सची निर्मिती करण्यात निती आयोगाअंतर्गत कोविड-19 लसीकरणासाठी प्रशासनातील राष्ट्रीय तज्ञ गटही केंद्र स्तरावरील समिती देशभरातील लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवणार आहे. लसीकरणाबाबतच्या महत्वाच्या निर्णयाचे आणि पॉलिसी ठरवण्याचे अधिकार या केंद्रीय स्तरावरील समितीला देण्यात आल्याची माहिती आम्हाला उपलब्ध झाली आहे. तीन टप्प्यांमध्ये ही लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
दुसर्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणजेच पोलिस, फायर ब्रिगेड, सफाई कर्मचारी, महापालिका कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहीती आहे. आणि तिसर्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींचा समावेश केल्याचे समजते. कोरोना महामारीत सर्वच पत्रकारांनी काम केलेले आहे. आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्या जोडीने पत्रकारांनी देखील जीवाची पर्वा न करता काम केले आहे. यामुळे काही पत्रकारांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पत्रकार देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून या काळात होते आणि आहेत. त्यामुळे लसीकरणार्या दुसर्या टप्प्यात पत्रकारांचा देखील समावेश करण्यात यावा आणि पत्रकारांचेही लसीकरण दुसर्या टप्प्यातच करण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत.
आमच्या मागणीचा योग्य तो विचार व्हावा आणि पत्रकारांचे लसीकरण दुसऱ्या टप्प्यातच करण्यात यावे अशी मागणी कोपरगांव तालुकाध्यक्ष मनिष जाधव, उपाध्यक्ष जनार्दन जगताप, सचिव विनोद जवरे, शहराध्यक्ष हाफीज शेख, उपशहराध्यक्ष स्वप्नील कोपरे, तालुका सहसिचव विजय कापसे, कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव, तालुका सहसचिव अक्षय काळे, तालुका संघटक शिवाजी जाधव, तालुका सहसंघटक लक्ष्मण जावळे, तालुका सह. संघटक फकिरा टेके, तालुका सहसंघटक रविंद्र जगताप, शहर संघटक योगेश गायके, शहसचिव अमोल गायकवाड, संदीप विदुर, सुमित थोरात, गणेश कांबळे, गहिनाथ घुले, समाधान भुजाडे, रविंद्र साबळे, मधुकर वक्ते, अनिल दिक्षीत, योगेश रुईकर, सोमनाथ डफळ यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत