कोपरगावचे पाणी म्हणजे राजकारण्यांची गुडगुडी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावचे पाणी म्हणजे राजकारण्यांची गुडगुडी

  कोपरगाव(वेबटीम ) राजकीय नेत्यांना शेती व पिण्याच्या पाण्याची आठवण येते मात्र कोपरगावचे पाणी म्हणजे राजकारण्यांची गुडगुडी आहे असे मत लोक स...

 कोपरगाव(वेबटीम)

राजकीय नेत्यांना शेती व पिण्याच्या पाण्याची आठवण येते मात्र कोपरगावचे पाणी म्हणजे राजकारण्यांची गुडगुडी आहे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे व्यक्त केले.

आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याचे व शहराचे राजकारण हे मदाऱ्याच्या खेळाप्रमाणे झाले असून खेळ सुरू करण्यापूर्वी ज्या प्रमाणे मदारी गुडगुडी वाजवून एक एक साप काढत असतो. त्याप्रमाणे कोपरगाव तालुक्यात विधानसभा व नगर पालिकेच्या निवडणूका आल्या की कोपरगाव तालुक्याचे राजकारणी आपल्या ठरलेल्या पोतडीतून शेती व पिण्याच्या पाण्याचे निळवंडे पाईपची बंदिस्त पाईप लाईन पाच नंबर तळे हे ठराविक साप गुडगुडी वाजवून बाहेर काढतात. आणि त्यांच्या पुंगीच्या तालावर डोलणारे कार्यकर्ते आमच्या नेत्यांना तालुक्याच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची कशी काळजी आहे याचे प्रात्यक्षिक दाखवतात मात्र निवडणूक झाल्यावर पिण्याचे व शेतीच्या पाण्याचे साप सोयीस्कर रित्या टोपलीत झाकून ठेवतात हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.

कोपरगाव तालुक्यावर गेली अनेक वर्षांपासून आलटून पालटून काळे व कोल्हे यांच्या ताब्यात सत्ता आहे माजी खा.कै. शंकरराव जी काळे,माजी खा कै सूर्यभान पा वहाडणे व माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी अनेक वर्षे या तालुक्याचे नेतृत्व केले 

 आता देखील आशुतोष काळे आमदार तर विजयराव वहाडने लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत.मागील पाच वर्षे  स्नेहलता कोल्हे आमदार होत्या. मात्र पिण्याच्या व शेतीच्या पाण्याबाबत कोणीच ठोस भूमिका घेताना दिसत नाही. यावर्षी सर्वाधिक पाऊस झाला अनेक धरणे अनेकदा शंभर टक्के भरले पण नियोजन शून्य कारभारामुळे आजही जनतेला सहा दिवसाआड पिण्याचे पाणी मिळते.तर गाजावाजा करून कोपरगाव शहरात पाट पाण्याची बैठक होऊन देखील जनतेच्या तोंडाला पाने पुसली गेली उलट निवडणूक आली की या पाणी प्रश्नांची गुडगुडी वाजवली जाते आणि निवडणूक संपली की हे हुकमी साप पुन्हा टोपलीत बंदिस्त केले जातात हे कोपरगावच्या जनतेचे दुर्दैव आहे असे या पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत