किंग मेकरची भूमिका बजावू : ढोकणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

किंग मेकरची भूमिका बजावू : ढोकणे

 उंबरे ः वेबटीम     आम्ही स्वतः निवडणुकीच्या मैदानात असलो काय किंवा नसलो काय..पण, आम्ही ज्याच्यामागे उभे राहू, तो ‘किंग’ होणार आणि आम्ही ‘कि...

 उंबरे ः वेबटीम 


   आम्ही स्वतः निवडणुकीच्या मैदानात असलो काय किंवा नसलो काय..पण, आम्ही ज्याच्यामागे उभे राहू, तो ‘किंग’ होणार आणि आम्ही ‘किंगमेकर’ ठरू, असा विश्‍वास युवानेते गोरक ढोकणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, आपणही लढण्याच्या अजुन निर्णय घेतला नसला तरी ज्याला ‘शब्द’ देवून त्याचे प्रामाणिक काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे

.

 


 गोरक ढोकणे म्हणाले, माझ्याकडे अनेक पार्ट्यांचे लोकं निवडणुकीत उभे रहावे म्हणून आग्रह करत आहेत. मात्र, मी अजुनतरी काहीही निर्णय घेतलेला नाही. सोमवारी मी याबाबत निर्णय जाहीर करणार आहे. परंतु, प्रभाग क्रमांक पाचमध्ये अजुनही विकासाची अनेक कामे बाकी आहेत. येथील जनतेला सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी या प्रभागातील समस्यांची माहिती असणारे, जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची धमक असणारे, कायम जनतेच्या सुखदुखात असणार्‍या आणि गोरगरीबांना मदतीचा हात देणार्‍या लोकांनाच निवडून देण्याची गरज आहे. यासाठी मी स्वतः वेगळी भूमिका घेवून कामाच्या माणसांच्या मागे जनतेने उभे राहण्याचे आवाहन करणार आहे. निश्‍चितच जनताही कामाच्या माणसांना निवडून देईल व गावच्या विकासाला हातभार लावेल, असेही ढोकणे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत