उंबरेत काय आहे ‘जनतेचा आवाज’ ! वाचा आता दररोज !!! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरेत काय आहे ‘जनतेचा आवाज’ ! वाचा आता दररोज !!!

उंबरे :  वेबटीम  उंबरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.  विजू माळवदेच्या गरम चहाच्या झुरक्याचा आनं...

उंबरे :  वेबटीम


 उंबरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.  विजू माळवदेच्या गरम चहाच्या झुरक्याचा आनंद घेत ग्रामस्थ राजकीय आराखडे बांधताना दिसत आहे. तर राजस्थानी आणि तांबे टी सेंटरमध्येही इच्छुकांनी आपले ‘वॉर रुम’ तयार केल्याचे चित्र आहे. त्यात, हापसेंच्या गरम भज्याची चव चाखून कुणाच्या उमेदवारीने कुणाला ‘मिरची’ झोंबेल, याचीही चर्चा चवीने सुरू आहे. 

 


उंबरेचे राजकारण म्हणलं की,  पैशांची उधळपट्टी आलीच म्हणून समजा. त्यामुळे गावात, त्यातच   प्रभाग क्रमांक पाचमध्ये काळजावर दगड ठेवून उभे राहण्याचे धाडस शक्यतो सामान्य माणूस करत नाही. याशिवाय अन्य प्रभागातही ‘याला गाडा, त्याला  पाडा’ असेही डावपेच असल्याने येथेही उमेदवार हे ‘ताक फुंकूण’च उभे राहतात. याशिवाय मतदार देखील एैनवेळी कुणाची जिरवतात, याचाही काही भरवसा नसतो. एकूणचं काय तर नेत्यांच्या आणि जनतेच्या डोक्यात नेमकी काय ‘टिकटिक’ सुरू आहे, याचा निकाल लागेपर्यंत कुणाला कानोसाही समज नसल्याने नेहमीच उंबरेची निवडणूक तालुक्याच्या राजकीय नेत्यांसाठी एक अभ्यासाचा विषय ठरलेली असते. 

    यंदाही ही निवडणुक गाजणार आहे. येथे सत्ताधारी गटाचे नेते तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुनिल आडसुरे, कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे, भाजपाचे तालुका उपप्रमुख राजेंद्र ढोकणे, भाजपाचे ज्ञानदेव माऊली क्षीरसागर, शिवसेनेचे  तालुका प्रमुख विजय ढोकणे, तालुका उपप्रमुख कैलास आडसुरे, डॉ. रामढोकणे फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण ढोकणे, छत्रपती प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष विलासराव ढोकणे, लक्ष्मण पटारे आदींच्या भूमिककडे लक्ष असणार आहे. 

    गावात नेमकं किती पॅनल होणार, कोण कुणासोबत जाणार, कोणाला कोणते वार्ड देण्याची तडजोड ठरेल, त्यांचे उमेदवार कोण असतील ?  याची सर्व राजकीय चर्चा आता बसस्थानकावरील चहाचे सेंटर आणि सलुनच्या दुकानात कानावर पडताना दिसते. या चर्चेत प्रामुख्याने सामान्य जनता सहभागी होत असल्याने अगदी परखडपणे ते आपले मत व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजणार असल्याची शक्यता आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत