कोपरगावात जनरल स्टोअरवर चोरट्यांचा डल्ला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात जनरल स्टोअरवर चोरट्यांचा डल्ला

  कोपरगाव( प्रतिनिधी)  कोपरगाव शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून मागील  ११ डिसेंबर रोजी लोखंडी सुरऱ्याचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याला पाच...

 कोपरगाव( प्रतिनिधी) 

कोपरगाव शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून मागील  ११ डिसेंबर रोजी लोखंडी सुरऱ्याचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याला पाच लाखाला लुटले ती घटना अजून ताजी असूनच  दि.१४ डिसेंबर रोजी पुन्हा शहरातील नगर मनमाड हायवे लगत बेट नाका भागातील जनरल स्टोअर चे दुकान फोडून रोकड आणि सामानाची चोरी केल्याचा प्रकार सोमवार दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी उघकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील बेट नाका भागात अभिषेक आव्हाड (वय-२५) रा.बेट नाका त्यांचे अथर्व जनरल स्टोअर नावाचे जनरल स्टोअरचे दुकान आहे. १४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोट्यांनी दुकानाचे पत्रे कंपाउंडमध्ये  प्रवेश केला व उचका पाचक करून  दुकानातील १५०० रूपये रोकड व मुद्देमाल असा एकूण रूपये ३४ हजार सातशे किंमतीचा एकूण माल चोरून नेला.

अभिषेक राजेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादी वरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरुद्ध गु. रजि. न. ८४०/२०२० भादवी कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पो. नि. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास स.फौ.एस.सी.पवार हे करत आहे.

पोलीस प्रशासन या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काही ठोस पाउल उचलतील का या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत