कोपरगाव मनसेचे विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव मनसेचे विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातील विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मनस...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव शहरातील विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मनसेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले की,शहरातील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्येत वाढ करण्याची तसेच कोपरगाव शहर पोलीस पेट्रोलिंग वाहन खराब असल्यामुळे त्यांना नवीन वाहन देण्यात यावे तहसील कार्यालयात कोतवाली पदाची भरती करावी तर विस्तापितांच्या खोकाशॉप साठी नियोजन करून देण्यात यावा, नगरपालिकेच्या 42 कोटीची पाणी योजनेची चौकशी होण्याची मागणी  करण्यात आली आहे. 

या वेळी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे म्हणाले की ,आम्ही निवेनाद्वारे केलेल्या मागण्या शहराच्या हितासाठी आहे.सदर मागण्यांवर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करून त्या तात्काळ मार्गी लावू असे सांगितले .


या वेळी मनसे शहराध्यक्ष सतीश आण्णा काकडे, माजी तालुकाध्यक्ष आलिम शहा, उपतालुका अध्यक्ष रघुनाथ मोहिते, उपशहर अध्यक्ष विजय सुपेकर,अनिल गाडे हिंदू सम्राट संघटना संस्थापक व‌ गिताई प्रतिष्ठानचे सचिव निलेश ( बापु ) काकडे, वाहतूक तालुकाध्यक्ष जावेद शेख, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते,विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव ,हिंदु सम्राट संघटना उपाध्यक्ष अनिकेत खैरे, अजिंक्य क्लब चे अध्यक्ष विक्रम काकडे, आदि मनसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत