कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव नगरपालिकेने न्यायालय परिसरात गाळे बांधावे अशी मागणी कोपरगाव वकील संघाचा ठराव करून नगर पालिकेकडे केली होती. मात्र न...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव नगरपालिकेने न्यायालय परिसरात गाळे बांधावे अशी मागणी कोपरगाव वकील संघाचा ठराव करून नगर पालिकेकडे केली होती. मात्र नगरपालिकेने या प्रस्तावास केराची टोपली दाखवली असल्याचे लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले, कोपरगाव शहरात जिल्हा व दिवाणी कनिष्ठ व वरिष्ठ स्तर तसेच सहकार न्यायालय असे सात न्यायालये आहेत. त्याच प्रमाणे कोपरगाव वकील संघात सुमारे दोनशे पेक्षा जास्त वकील वकिली व्यवसाय करतात सुमारे वीस वर्षांपूर्वी न्यायालय परिसरात जागा खरेदी करून काही वकिलांनी चेंबर अर्थात ऑफिस बांधकाम केले आहे. त्या ठिकाणी त्यांचे ऑफिस आहेत मात्र त्या नंतर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक वकील सभासद झालेले आहेत. मात्र या परिसरात नवीन वकिलांना ऑफिस करिता जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या वकिलांना व्यवसाय करताना अडचण निर्माण होत आहे . त्यामुळे वकील संघाने बैठक घेऊन व त्या बैठकीत ठराव करून नगर पालिकेकडे ऑफिस करिता गाळे बांधून देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
अनेक महिने उलटून गेले तरी नगरपालिकेने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तसेच या परिसरात या पूर्वी पोलीस उपअधीक्षक कार्यालयास जागा देण्यात आली होती. सदर कार्यालय शिर्डी येथे झाले आहे . सदर जागा अद्याप नगरपालिकेने परत घेतली नाही. ती परत घेतल्यास व या परिसरात नगर पालिकेने गाळे बांधल्यास अनेक वकिलांना ऑफिस करता येईल तसेच या परिसरात स्टेशनरी, झेरॉक्स,टायपिंग यासारखे व्यावसायिकांना देखील उपलब्ध होऊ शकतो त्याच प्रमाणे नगरपालिकेला देखील आर्थिक उत्पन्न मिळू शकते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत