उंबरे ः वेबटीम गावातील माळवाडी भागात अजुन अनेक विकास कामे करायची असल्याने यावेळी मी प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष निवडणूक लढणार असल्या...
उंबरे ः वेबटीम
गावातील माळवाडी भागात अजुन अनेक विकास कामे करायची असल्याने यावेळी मी प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा युवानेते राहुल दादा वैरागर यांनी केली आहे.
राहुल वैरागर म्हणाले, माळवाडीचे अनेक प्रश्न मला माहिती आहेत. येथील लोकांना पिण्याचे पाणी मी देणार आहे. त्यासाठी मी पदर पैसे खर्च करण्यास मागे पुढे पाहणार नाही. तसेच या भागात शाळा, दवाखानेसाठीही मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. येथील तरूणांना निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मी अत्याधुनिक अशी जीम देणार आहे. त्यातून तरूणांचे आरोग्य सदृढ राहील. याशिवाय येथील सामान्य जनतेसह छोट्या मोठ्या व्यवसायिकांना मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा पुरविणार आहे. मी फक्त बोलणार नाही तर करून दाखवणार आहे.
माझं शिक्षण कमी असले तरी मी अनेक गावात फिरलो आहे. तेथील विकास मी माझ्या डोळ्याने पाहिला आहे. त्यामुळे हा विकास माझ्या गावातही व्हावा, अशी माझी इच्छा आहे. माळवाडीच्या तरूणांनी मी निवडणूकीत उभे रहावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मी आता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असून छत्रपती प्रतिष्ठानशी माझी याबाबत चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र मला तिकीट न दिल्यास अपक्ष लढणार असल्याचेही ते म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत