मला आदेश दिल्यास एक मधून लढणार : पै. गणेश तोडमल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मला आदेश दिल्यास एक मधून लढणार : पै. गणेश तोडमल

उंबरे ः वेबटीम   उंबरे गावात माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो. त्यामुळे या गावासाठी काही तरी चांगले करण्याचे माझे स्वप्न आहे. त्या धर्...

उंबरे ः वेबटीम

 

उंबरे गावात माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो. त्यामुळे या गावासाठी काही तरी चांगले करण्याचे माझे स्वप्न आहे. त्या धर्तीवर मला पक्षाने आदेश दिला तर प्रभाग क्रमांक एकमधून मी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मत भाजपाचे युवानेते  गणेश तोडमल यांनी व्यक्त केले.

गणेश तोडमल म्हणाले, उंबरे ही संताची भूमि आहे. पण येथे अजुनही  विकास झालेला नाही. माझ्या मायमाऊलीच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचे काम कोणीही केलेले नाही. या गावात रस्तेही चांगले नाहीत, गटारीचे कामेही होणे बाकी आहे. गावात पोलावर लाईट नाहीत, जिथं पहावं तिथं राजकारण सुरू आहे. यात गावाचा विकास खुंटला आहे. आपले गाव विकासाच्या बाबतीत 15 वर्षे मागे गेले आहे. आता तरूण जागे झाल्याने गावात बदलाचे वारे वाहू लागले आहे. भाजपाच्या नेत्यांनी मला गावाच्या निवडणुकीत लढण्याचे आदेश दिले तर मी एक नंबर वार्डात लढण्यास तयार आहे. कर्डिले साहेबांशी मी याविषयावर बोलणार आहे. त्यानंतरच मी लढायचे की नाही ? ते ठरविणार असल्याचेही तोडमल म्हणाले आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत