कोपरगाव(वेबटीम) गेल्या अनेक वर्षांपासून को परगाव ची जनता पिण्याच्या पाण्याची बळी ठरत आहे मात्र आगामी नगपालिका निवडणुकीत कोपरगावची जनता क...
कोपरगाव(वेबटीम)
गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावची जनता पिण्याच्या पाण्याची बळी ठरत आहे मात्र आगामी नगपालिका निवडणुकीत कोपरगावची जनता कोपरगाचा पाणी प्रश्न राजकीय बळी घेतल्याशिवाय सुटणार नाही असा आशावाद लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील राजकीय नेते निवडणूक आली की पिण्याचे पाण्याचा प्रश्न पेटवत ठेऊन आपली पोळी भाजून घेतात मात्र सर्वच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी सत्तेच्या खुर्च्या उबऊन झाल्या मात्र कोपरगावची जनता पाणी प्रश्नांची बळी ठरत आहे.
एके काळी रेशन कार्डवर पिण्याचे पाणी देणारी नगर पालिका म्हणून बीबीसी ने वृत्तांकन केलेली नगर पालिका मात्र अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकली नाही.
नुकतेच नगर पालिकेचे सर्व तळे पाण्याने भरले तरी पण पिण्याचे पाणी सहा दिवसांनी मिळेल असे नगर पालिका जाहीर करते आणि त्यानंतर सत्ताधारी व विरोधक पाण्यावरून आपली पाठ थोपटून घेत शिमगा साजरा करत असले तरी पिण्याचे पाणी सहा दिवस आड मिळणार हे कोपरगाव ची जनता जाणून आहे कधी पाच नंबर तळे तर कधी निळवंडे वरून बंदिस्त पाईप लाईन ने पाणी पुरवठा करणे ही अस्वासने दिली गेली सहमती एक्सप्रेस ने कोट्यवधी रुपये खर्चून पाईप लाईन टाकली मात्र तिच्या चाचणी पूर्वी ठेकेदाराला पैसे देऊन मोकळे केले
स्वच्छ व मुबलक पाण्याचे पाणीदार स्वप्न दाखवून लोकप्रिय नगराध्यक्ष निवडून चार वर्षे झाली मात्र नवीन पाईप लाईन ची चाचणी, बेकायदेशीर नळ जोडणी बंद करणे , अनेक ठिकाणी पाण्याचे लिकेज हे प्रश्न अश्वासांच्या पाण्यात वाहून गेले जनतेच्या नशिबी पाण्याची वणवण संपली नाही.केवळ पिण्याचे पाणी व आवर्तन आमच्या नेत्याच्या प्रयत्नामुळेच आले हा अंक देखील नागरिकांच्या अंग वळणी पडला आहे.
बहुचर्चित पाच नंबर तळे अजून बाल्यावस्थेत रांगताना दिसत आहे.मात्र त्याच्या प्रसिद्धीच्या जाहिराती पाहून नागरिक वैतागले आहे.भविष्यात नगर मनमाड महामार्ग विस्तारित झाल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले तळे अतिक्रमणाचा जाणार आहे. अद्याप त्या विषयावर कोणतेच निर्णय घेण्यात येताना दिसत नाही.तसेच समृद्धी महामार्गाचे काम पुढील एक दीड वर्षात पूर्ण होऊन वैजापूर कोपरगाव सीमेवर प्रस्तावित स्मार्ट सिटी साठी पाणी जाणार आहे. त्याच प्रमाणे कोपरगाव परिसरात देखील अनेक मजूर व्यावसायिक येतील त्या नंतर वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र या प्रश्नाकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नाही असे असले तरी कोपरगावच्या जनतेने पिण्याच्या पाणी प्रश्नावर काळे-कोल्हे-वहाडणे यांची चव चाखली आहेच मात्र आगामी नगर पालिका निवडणुकीत पाणी प्रश्ना वरून पोळी भाजून घेणाऱ्याचा राजकीय नेत्यांचा राजकीय बळी घेतल्या शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही असेच दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत