कोपरगाव(वेबटीम) नगरपरिषदेची सत्ता ताब्यात असतांना अनेक माजी नगराध्यक्ष-नगरसेवक व नेत्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता मनमानी करू...
कोपरगाव(वेबटीम)
नगरपरिषदेची सत्ता ताब्यात असतांना अनेक माजी नगराध्यक्ष-नगरसेवक व नेत्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता मनमानी करून वेळोवेळीबचुकीच्या पद्धतीने नळजोड दिले.त्यातील काहींनी पैसे खाऊन,काहींनी वॉर्डमध्ये मतदार खुष ठेवून राजकारण करण्यासाठी, काहींनी नेत्यांच्या आदेशावरून मेन लाईनवर नळजोड देऊन ठेवले.त्यामुळेच त्यातील काहींना 24 तास,काहींना 12 तास,काहींना 8 तास,काहींना 6 ते 4 तास पाणी मिळते.सर्वसामान्य नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून बेजाबदारपणे सत्ता भोगणाऱ्यांनी पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडविला असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.
नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हंटले की, सत्ता भोगून झालेलेच काहीजण आज पाणी का पुरत नाही,दिवसाआड पाणी द्या,मेन लाईनवरील नळजोड का तोडत नाही असे विचारत आहेत,निवेदने-बातम्या-फोटो देऊन आपल्यालाच जनतेची फार काळजी असे भासवत आहेत.
कुठलाही विचार न करता मेनलाईनवरील नळजोड तोडायचे ठरल्यास शहरातील अनेक रस्ते फोडावे लागतील.म्हणून रस्त्यांचे नुकसान न करता बेसुमार पाणी वापरणारे नळजोड कमी नियोजन सुरू आहे.
नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नविन सेवक जागे झाले आहेत,होत आहेत.मी नम्रपणे जाहिर करतो कि, बेसुमार पाणी वापर होणारे नळजोड कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तोडले जातील, तसे नियोजन सुरू आहे.बेसुमार पाणी वापरणारे कोण कोण आहेत हे नगरपरिषदेत येऊन तुम्ही पाहू शकता.मेनलाईनवर नळजोड असलेले माजी नगराध्यक्ष श्री. राजेंद्र झावरे यांनी मात्र 2012 मधेच स्वतःहून नगरपरिषदेला पत्र दिले कि, माझे मेनलाईनवरील नळजोड बदलून सबलाईनवर घ्यायला मी तयार आहे.श्री.झावरे यांनी मनाचा मोठेपणा दाखविला तसा मनाचा मोठेपणा दाखविणे इतरांना का जमले नाही?
अनेकजण नगराध्यक्षपद भोगून गेले त्यांनी असे नळजोड का तोडले नाहीत,पैसे खाऊन का नळजोड वाटले?याचे जनतेला उत्तर द्या.मी मात्र असे नळजोड कमी करून शहराचे पाणी वाचविण्यासाठी काम करत आहे याची खात्री बाळगावी असे वहाडणे यांनी म्हंटले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत