काळे-कोल्हेंनी साखर कारखान्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

काळे-कोल्हेंनी साखर कारखान्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्या

  कोपरगाव( प्रतिनिधी)  काळे- कोल्हे-साखर कारखाने किंवा त्यांच्या हिताच्या संस्था निवडणूक बिनविरोध करतात त्याचप्रमाणे सध्या होऊ घातलेला ग्राम...

 कोपरगाव( प्रतिनिधी)

 काळे- कोल्हे-साखर कारखाने किंवा त्यांच्या हिताच्या संस्था निवडणूक बिनविरोध करतात त्याचप्रमाणे सध्या होऊ घातलेला ग्रामपंचायती निवडणुकाही करोना पार्श्वभूमीवर त्यांनी बिनविरोध करून द्यावा अशी मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीनराव शिंदे यांनी केली आहे.

तालुक्यातील काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांबरोबर शिंदे यांची आज बैठक झाली यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिंदे पुढे बोलताना म्हणाले की कोल्हे- काळे-परजणे सर्वजण एकत्र येऊन साखर कारखाने, दूध संघ बिनविरोध करतात. याठिकाणी आपल्या बगल बच्चानच्या नेमणुका करून सच्चा कार्यकर्त्यावर अन्याय केला जातो. मात्र तालुक्यातील अन्य निवडणुकीत घराघरात भांडणे लावून आपापसात निवडणुका लढवायला लावतात. यामध्ये जनतेची फसवणूक करतात.तालुका मार्केट कमिटी जशी सर्वजण एकत्र आले व मिळून सत्ता उपभोगत आहेत. तसेच जर त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना,भाजप, काँग्रेस, आरपीआय,शेतकरी संघटना व आणि सर्वच पक्षाच्या गावागावातील कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांना उमेदवारी देऊन तालुक्यातील सध्या होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध करावा. कारण करोणो  पार्श्वभूमीवर हे गरजेचे आहे.


 आमदार निलेश लंके यांनी जशी घोषित केले की पारनेर तालुक्यातील बिनविरोध  होणाऱ्या ग्रामपंचातीस  25 लाख विकासाकरता देणार आहेत. त्या धर्तीवर आपल्या तालुक्यातील ही खासदार- आमदार निधी बरोबरच संजीवनी, कोळपेवाडी साखर कारखाने व गोदावरी दूध संघाने बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतच्या  गावाच्या विकासाकरता 25 लाखांचा निधी द्यावा.याकरता त्यांनी तसा प्रयत्न करावा म्हणजेच त्यांना तालुक्याच्या जनतेचा कळवळा असल्याचे स्पष्ट होईल असे शेवटी नितीनराव शिंदे यांनी म्हटले आहे. या बैठकीस विष्णुपंत पाडेकर,ज्ञानेश्वर भगत,राहुल गवळी,विजयराव जाधव, चंद्रहर जगताप, शब्बीर भाई शेख ,राजेंद्र औताडे व अन्य महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत