राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी आघाडीच्या निवडी जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी आघाडीच्या निवडी जाहीर

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी आघाडीच्या देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी शहराध्यक्षपदाच्या निवडी नुकत्याच ज...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी आघाडीच्या देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी शहराध्यक्षपदाच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या.

 राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष अजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संदीपजी वर्पे यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष पदी विक्रांत पंडित तसेच देवळाली प्रवरा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी ऋषीकेश संसारे तसेच राहुरी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाउपाध्यक्ष पदी सुमित मुसमाडे यांची नियुक्ती करण्यात आली. 

  यावेळी शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, नगरसेवक शैलेन्द्र पाटील कदम, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाळासाहेब खांदे,आंतराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, वैभव गिरमे, विश्वास पाटील, अशोकराव खुरुद, उत्तमराव कडू, जगदीश ढुस, अरुण ढुस, कुणाल पाटील, कारभारी होले, अरुण वाळके, शँकर धोत्रे, मयुर कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली प्रवरा शहरात रक्तदान शिबिर पार पडले त्यास रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत