अकोले(वेबटीम) ग्रामपंचायत हा विकासाचा केंद्रबिंदू असून गाडा समर्थपणे चालविण्यासाठी चांगले कारभारी निवडून आले पाहिजे.या साठी कार्यकर्त्यांनी...
अकोले(वेबटीम)
ग्रामपंचायत हा विकासाचा केंद्रबिंदू असून गाडा समर्थपणे चालविण्यासाठी चांगले कारभारी निवडून आले पाहिजे.या साठी कार्यकर्त्यांनी भाजप पक्षातील सुशिक्षित युवकांना संधी द्यावी,बाहेरील आयात उमेदवाराला संधी देऊ नका. विधानसभेत निवडून देऊन जनता चुकीची शिक्षा भोगीत असून पक्ष संघटना मजबूत करावी असे आवाहन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
भाजपा कार्यालयात आयोजित तालुका कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीत श्री. पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे हे होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, वसंतराव मनकर, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, अकोले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे.डी. आंबरे, अमृतसागर दूध संघाचे संचालक विठ्ठलराव चासकर, अगस्ति साखर कारखान्याचे संचालक कचरू शेटे, अशोक देशमुख, राजेंद्र डावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब कासार, बाळासाहेब सावंत, पंस सदस्य गोरख पथवे, माधवी जगधने, अलका अवसरकर आदी उपस्थित होते.
श्री पिचड पुढे म्हणाले की,नविन पदाधिकारी यांनी जबाबदारीने कार्य करीत पक्ष वाढविण्यासाठी काम करावे.ग्रामपंचायत निवडणूक कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवावी,त्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्याना बरोबर घ्यावे.असा सल्ला ही त्यांनी दिला.
भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी पक्षातील पदे ही जबाबदारी असून भाजपा त काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. यावेळी संघटनात्मक काम वाढविण्यासाठी सरचिटणीस व उपाध्यक्ष, सचिव यांचेकडे जि.प.गट, गणानुसार काम विभागणी करण्यात आली.
यावेळी वसंतराव मनकर, राजेंद्र देशमुख, सौ शारदा गायकर, भरत घाणे, सुभाष वाकचौरे, गणेश पोखरकर, बाबासाहेब उगले, बाबासाहेब आभाळे, भाऊसाहेब गोडसे, राहुल देशमुख, अविनाश तळेकर, नाजीम शेख, विठ्ठल कानवडे, ज्ञानेश पुंडे, अमोल गोडसे, दत्तात्रय वाकचौरे, वैशाली सावंत, यांनी निवडणूक व संघटना विषयी मते व्यक्त केली.
बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस यशवंतराव आभाळे यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर शेवटी आभार सरचिटणीस मच्छिंद्र मंडलीक यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत