उंबरे : वेबटीम उंबरेच्या राजकारणात दररोज राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. आज सकाळीच कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे यांनी आपण ...
उंबरे : वेबटीम
उंबरेच्या राजकारणात दररोज राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. आज सकाळीच कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे यांनी आपण अजुन आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याचे सांगून तसा कोणत्याही गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, ढोकणे नेमके सत्ताधार्यांसोबत जाणार की विरोधी गटाबरोबर ? याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आज सकाळी 10 वाजता झालेल्या एका गुप्त बैठकीत विरोधी मंडळाने आपली व्यूहरचना आखल्याचेही कानावर येत आहे. तर सत्ताधारी गटानेही तुल्यबळ उमेदवारांचे अर्ज भरून घेण्याबाबत चाचपणी पूर्ण केली आहे.उंबरेच्या राजकारणात राजकीय समिकरणे बदलताना दिसत आहे. एकीकडे सत्ताधारी गटाची मजबूत पकड दिसत असताना दुसरीकडे काही नेते व कार्यकर्ते मात्र आम्ही कोणत्याही गटात जाण्याचा अजून निर्णय घेतलेला नाही. सत्ताधारी गटाच्या बेरजेत धरले जाणारे तनपुरे कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे यांनी गुगली टाकत आपण अजुन कोणत्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उंबरेचे राजकीय समिकरणे बदलली आहेत. यातून नवनाथ ढोकणे यांनी आपल्या गटात सहभागी व्हावे, यासाठी दोन्ही मंडळाकडून प्रयत्न असणार आहेत. मात्र त्यांची नेमकी भूमिका ते लवकरच स्पष्ट करणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे गावचे लक्ष असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत