देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठान व झी टॉकीज यांच्यावतीने आयोजित कीर्तन महोत्सवाची...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठान व झी टॉकीज यांच्यावतीने आयोजित कीर्तन महोत्सवाची सांगता गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात झाली. या कीर्तन महोत्सवात केवळ ८ दिवसात तब्बल २४ कीर्तने पार पडली.
सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले गणेश भांड यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानने या हरिनाम सप्ताहाचे स्व.बबनराव भांड यांच्या स्मरणार्थ आयोजन केले होते. या सप्ताह कालावधीत महाराष्ट्रातील १२ किर्तनकारांची २४ कीर्तने मोठ्या उत्साहात पार पडली. राहूरी तालुक्यातील गायनाचार्य, पखवाज वादक, विणेकरी, टाळकरी यांनी साथसंगत देण्यासाठी सहकार्य केले. या सप्ताहात पार पडलेल्या कीर्तनाचे झी टॉकीज वाहिनीवर २०डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या काळात 'गजर कीर्तनाचा , सोहळा आनंदाचा' सकाळी ७ ते ९ या वेळेत प्रसारित होणार आहे.
दरम्यान गुरुवारी सप्ताहाच्या सांगता प्रसंगी चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश भांड, चैतन्य अँक्वाचे चेअरमन संदीप भांड, सुरेखा भांड, मंदाकिनी भांड, दुर्गा भांड यांच्यासह कार्यकारी निर्माता हेमंत पांचाळ, दिग्दर्शक सागर सावंत, अमित परांजपे, सचिन वाडेकर, प्रमोद भोसले,अनिकेत घरवाढवे,सुनील उकिरडे, महेंद्र हापसे,लोकसेवा मल्टीस्टेटचे चेअरमन नकुल कडू, राजेंद्र लोंढे,डॉ.विजय मकासरे, यमनाजी आघाव, रावसाहेब शिंदे, भारत साळवे, किशोर महाराज जाधव, संपत महाराज जाधव, नानासाहेब कर्डीले , गौरव भांड, सुमेध भांड आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, प्रतीक जाधव, भाऊसाहेब दळवी, गंगाधर शिंदे, प्रकाश लांबे आदींसह चैतन्य उद्योग समूहाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*झी टॉकीजवर प्रसारित होणारे कीर्तन वेळापत्रक*
दि.२० व २१ डिसेंबर- ह.भ.प अलकाताई वाल्हेकर(नसरापूर, पुणे)
दि.२२ व २३ डिसेंबर- ह.भ.प किशोर महाराज जाधव(मानोरी, राहूरी)
दि.२४ व २५ डिसेंबर- ह.भ.प नेहाताई भोसले-साळेकर(सासवड, पुणे)
दि.२६ व २७ डिसेंबर-ह.भ. प कल्याण महाराज काळे(शेवंगाव, नगर)
दि.२८ व २९ डिसेंबर २०२०- ह.भ.प भागवताचार्य डॉ.विकासानंद महाराज मिसाळ(नगर)
दि.३० ते ३१ डिसेंबर २०२०- ह.भ.प सुसेन महाराज नाईकवाडे(बीड)
दि.१ ते ३ जानेवारी २०२१- ह.भ.प निलेश महाराज कोरडे(जुन्नर,पुणे)
दि.४ ते ५ जानेवारी २०२१-ह.भ.प गीतांजलीताई झेंडे( सासवड, पुणे)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत