राहुरी(वेबटीम) पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच...
राहुरी(वेबटीम)
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन ३० डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली असल्याची माहिती तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे व व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस यांनी दिली आहे.
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे ३० डिसेंबर रोजी चौथे पुण्यस्मरण असून या पुण्यस्मरण दिनानिमित्त डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे .कारखाना कार्यस्थळावर ३० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर १० वाजता कारखाना कार्यस्थळावर त्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. त्यानंतर ११ वाजता कारखाना अंतर्गत येणाऱ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे शैक्षणिक सामाजिक आर्थिक साखर उद्योग आदीं क्षेत्रांत विविध क्षेत्रामध्ये असलेले मोठे कार्य सध्याच्या तरुणांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून या युवकांना त्यांच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे.
८ वेळा खासदार असताना तसेच केंद्रीय मंत्री असताना त्यांनी केलेल्या विविध कामांची या युवकांना माहिती करून देऊन त्यांच्या कार्याला उजाळा दिला जाणार आहे सदर रक्तदान प्रसंगी जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदान शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे व व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस आदींसह संचालक मंडळाने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत