देवळाली प्रवरात ४ वर्षाची मुलगी दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात ४ वर्षाची मुलगी दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी

 देवळाली प्रवरा प्रतिनिधी                  येथील मातंग वस्ती भागातील घरकुल योजनेच्या दुसऱ्या मजल्या वरुन आस्ता अमोल वैरागर वय ४ वर्ष हि लहान...

 देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

                येथील मातंग वस्ती भागातील घरकुल योजनेच्या दुसऱ्या मजल्या वरुन आस्ता अमोल वैरागर वय ४ वर्ष हि लहान मुलगी पडून गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

             याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथील मातंग वस्ती येथे पाथर्डी येथुन पाहुणी म्हणून आलेली आस्ता हि घरकुल योजनेच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत असताना अचानक तोल गेल्याने कठड्यावरुन खाली पडली खालचा भाग सिमेंट क्राँक्रटीकरण असल्याने तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे.तिला तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत असुन आय.सी.यु.विभागात  तिच्यावर  उपचार सुरु आहेत.

            घरकुल योजनेचे कठडे व जिण्याच्या खिडक्या तुडलेल्या अवस्थेत असुन लहान मुलांच्या बाबत पुन्हा अशीच घटना घडू शकते. त्यामुळे नगर पालिकेने घरकुल योजनेतील खिडक्या व तुटलेले कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत