अकोले प्रतिनिधी अकोले शहरातील उत्तर भारतीय माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पाठीशी राहतील असे प्रतिपादन उत्तर भारतीय सेलचे नगर जिल्ह्याचे स...
अकोले प्रतिनिधी
अकोले शहरातील उत्तर भारतीय माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पाठीशी राहतील असे प्रतिपादन उत्तर भारतीय सेलचे नगर जिल्ह्याचे संयोजक राजेश शर्मा यांनी केले.
दिनांक २० डिसेंबर रोजी अंबिका लॉन्स येथे भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय सेल च्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे होते.यावेळी शिर्डी चे युवामोर्चाचे उपाध्यक्ष अमोल बडे ,भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,अकोले शहर सरचिटणीस हितेश कुंभार,मच्छिन्द्र चौधरी,अनिल कोळपकर,रामबदन यादव, राजू तिवारी यांचे सह मोठ्या संख्येने उत्तर भारतीय उपस्थित होते.
यावेळी श्री.शर्मा पुढे म्हणाले की,अकोले तालुक्यातील उत्तर भारतीयांच्या काही समस्या असतील तर ते माजी आमदार वैभवराव पिचड नक्की सोडवतील असा मला ठाम विश्वास आहे.आपण त्यांच्या मागे ठामपणे उभे रहावे असे आवाहन आपणा सर्वाना करतो.
यावेळी सीताराम भांगरे म्हणाले की, उत्तर भारतीय हे खूप कष्टाळू व कामात कुशल असून ते उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत.तुम्हाला काही अडचणी असतील,तुमच्या काही समस्या असतील तर माजी आमदार वैभवराव पिचड यांचे सह भाजपाचे सर्व कार्यकर्ते सोडवतील. शेवटी हितेश कुंभार यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत