कोपरगावात सहा दिवसाआड पाणी पुरवठा का?- काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात सहा दिवसाआड पाणी पुरवठा का?- काळे

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगावला शहराला पिण्याचे पुरवठा करणारे चारही तळे गच्च भरलेले असताना सहा दिवसा आड पाणी का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संज...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगावला शहराला पिण्याचे पुरवठा करणारे चारही तळे गच्च भरलेले असताना सहा दिवसा आड पाणी का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उपस्थित केला आहे.

संजय काळे यांनी म्हंटले की  कोपरगाव नगरपालिका व्यवस्थापन म्हणते पुढचे आवर्तन पाटबंधारे विभाग कधी देणार हे सांगत नसल्यामुळे पाणी सहा दिवस आड द्यावे लागते. 

गोदावरी डाव्या तट कालव्याची कालवा सल्लागार समिती ची बैठक कोपरगाव शहरात झाली. या बैठकीत माझा आग्रह होता कि पाटबंधारे विभागाने आवर्तने व त्यांच्या तारखा जाहीर कराव्यात. पण त्यांनी रब्बीत एक व उन्हाळ्यात दोन असे अवर्तने जाहीर केलेत पण तारखा जाहीर नाही केल्या.

तारखा जाहीर न केल्यामुळे शेतकरी नियोजन करू शकला नाही. त्याने सात नंबर फॉर्म भरला नाही. मुदत वाढवून देखील शेतकऱ्यांनी पाट पाण्याकडून पाठ फिरवली. प्रशासनाने जर तारखाच जाहीर केल्या नाही तर मिटींग मुंबईत घेतल्या काय कि कोपरगावला घेतल्या?  शेतकऱ्याला ग्रामपंचायत व नगरपरिषदांना त्याचा काय उपयोग असा सवाल काळे यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी अवर्तनाच्या तारखा जाहीर कराव्यात आणि पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे प्रश्न मिटवावे.. धरणात पाणी असून आमचे म्हणजे जनतेचे हाल करू नये असेही काळे यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत