आई पाठोपाठ थोरल्या मुलाचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आई पाठोपाठ थोरल्या मुलाचे निधन

  देवळाली प्रवरा(वेबटीम)      आईचे दुःख निधन झाले.थोरल्या मुलास  दुःख सहन न झाल्याने अवघ्या चारदिवसात  हृदयविकाराच्या झटका आल्याने आईपाठोपाठ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

     आईचे दुःख निधन झाले.थोरल्या मुलास  दुःख सहन न झाल्याने अवघ्या चारदिवसात  हृदयविकाराच्या झटका आल्याने आईपाठोपाठ थोरल्या मुलाचे निधन झाल्याची दुर्देवी घटना राहूरी तालुक्यातील  देवळाली प्रवरा येथे घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

          देवळाली प्रवरा येथील खांदे वस्ती येथील रहिवासी सोमनाथ खांदे यांच्या मातोश्री द्रोपदाबाई सोनाजी खांदे(वय-८८) यांचे १५ डिसेंबर वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अवघ्या चार दिवसात मयत द्रोपदाबाई यांचे थोरले सुपुत्र तूळशिराम खांदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अहमदनगर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना प्राणज्योत मालवली. या दोन्ही घटनेने खांदे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली असून आई व मुलाचा एकत्रित दशक्रिया विधी एकत्रित करण्याची दुर्देवी वेळ खांदे कुटुंबियांवर आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत