निसर्ग कन्सल्टन्सी "ला हकालण्या मागचे गौडबंगाल काय - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निसर्ग कन्सल्टन्सी "ला हकालण्या मागचे गौडबंगाल काय

कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरात पाणी पुरवठा योजनेची देखभाल करणारी निसर्ग कन्सल्टन्सी या कंपनीला हाकलण्यामागे काय गौडबंगाल आहे, हे जुन्या सत्ता...

कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव शहरात पाणी पुरवठा योजनेची देखभाल करणारी निसर्ग कन्सल्टन्सी या कंपनीला हाकलण्यामागे काय गौडबंगाल आहे, हे जुन्या सत्ताधाऱ्यांनी सांगावे असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

     

    कोपरगाव शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करून ती योग्य पद्धतीने पूर्णत्वास नेण्याचे काम करून घ्यायची जबाबदारी असलेल्या निसर्ग कन्सल्टन्सी या संस्थेला आधीच्या सत्ताधारी गटाने कामाबद्दल कुठल्याही सूचना-नोटीस न देता हाकलून लावले,तसा ठरावही करून घेतला.त्या कंपनीला हाकलण्यामागे काय गौडबंगाल आहे हे जुने सत्ताधारीच सांगू शकतात.नियमबाह्य पद्धतीने काम काढून घेतल्याने व केलेल्या कामाचे बिलही अदा न केल्याने त्या कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे.न्यायालयात जर त्या कंपनीच्या बाजूने निकाल लागला तर कोपरगाव नगरपरिषदेस एक ते दिड कोटी रुपयांचा भुर्दंड पडू शकतो.

कारण त्या कंपनीने केलेल्या कामाचे बिल व्याजासह मिळण्यासाठी दावा दाखल केलेला आहे.जनतेच्या कर भरण्यांमधून हे पैसे देणे म्हणजे कोपरगावातील प्रत्येक नागरिकाच्या खिशास झळ बसून शहर विकासाला पैसा कमी पडणार आहे.असा भुर्दंड जनतेला पडू नये म्हणून त्यावेळच्या सत्ताधारी सभासदांकडूनच ते वसूल करता यावेत यासाठी कायदेशीर सल्ला घ्यावा लागणार आहे.निसर्ग कन्सल्टन्सी ला हाकलले नसते तर नवीन पाणीपुरवठा योजना इतकी रखडली नसती.नगरपरिषद ताब्यात असतांना मनमानी करण्याच्या प्रवृत्तीमुळे संपूर्ण शहराची हानी होते याचे भान सेवकांना कधी येणार? असा सवाल वहाडणे यांनी विरोधकांना विचारला आहे .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत