राहूरी(वेबटीम) श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व सहकारी कर्मचारी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील व्या...
राहूरी(वेबटीम)
श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व सहकारी कर्मचारी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील व्यायाम शाळेचे साहित्य परस्पर विकले असून याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी राहूरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अरुण वाल्हेकर यांचा दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला असता त्यांच्या स्मरणार्थ श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये एक व्यायामशाळा(जिम) सुरू करण्यात आली होती. परंतु मागील वर्षी तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरटव मुद्देमाल कारकून सोमनाथ गाडेकर यांनी सदर व्यायाम शाळेतील सर्व साहित्य परस्पर विकुन त्याची विल्हेवाट लावल्याची असल्याचे समजते सदर व्यायाम शाळेचे साहित्य परवानगी घेऊन विकले का? ते कोणाला विकले? ते परस्पर विकण्याची परवानगी आहे का? याची चौकशी करावी अन्यथा २६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल असा इशारा डॉ.विजय मकासरे यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत