भारत बंद आंदोलनास कोपरगावात सर्वपक्षीयांचा पाठींबा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भारत बंद आंदोलनास कोपरगावात सर्वपक्षीयांचा पाठींबा

  कोपरगाव(वेबटीम) दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत या मागणीसाठी सुरू असलेल्या  शेतकरी आंदोलनकर्त...

 कोपरगाव(वेबटीम)

दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत या मागणीसाठी सुरू असलेल्या  शेतकरी आंदोलनकर्त्यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदला कोपरगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवल्याचे पहावयास मिळाले. 

 तसेच भारत बंदला कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देत कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की,केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्याच्या देशातील सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे ,शेतकरी प्रचंड अडचणीत असून या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून या कृषी कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहे.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदला कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना ,व राष्ट्रिय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही पाठिंबा देत असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन कायदे तातडीने मागे घ्यावेत यासाठी कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसील यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत