भारत बंद आंदोलनास कोल्हे यांचा विरोध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भारत बंद आंदोलनास कोल्हे यांचा विरोध

कोपरगाव(वेबटीम) ८ डिसेंबर रोजीच्या भारत बंद आंदोलनास भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विरोध दर्शविला असून व्यापारी आपले दुकाने बंद न ठेवत...

कोपरगाव(वेबटीम)

८ डिसेंबर रोजीच्या भारत बंद आंदोलनास भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विरोध दर्शविला असून व्यापारी आपले दुकाने बंद न ठेवता सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

 सोशल मीडियावर विवेक कोल्हे यांच्या नावाने फिरत असलेल्या पोस्टमध्ये म्हंटले की, ८- १२-२०२० रोजी कोपरगाव मध्ये होणारा बंद हा शेतकरी कृषी विधेयकाच्या विरोधाच्या नावाखाली विरोधकांची राजकीय भूमिका आहे,एके काळी याच विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी कृषी विधेयका बद्दल या पूर्वीच्या काळात समर्थन केलेले आहे..!!

महाराष्ट्र राज्याने अद्याप हा कायदा स्विकारलेलाच नसतांना बंद पुकारून स्थानिक बाजरपेठ आणि व्यापारी कोरोनामुळे त्रस्त असताना त्यात त्यांची आर्थिक पिळवणूक करणे हे लोकशाही मूल्यांना धरून नाही,जर विधेयकाचा विरोध करायचा असेल तर लोकशाही मार्गाने तहसीलदार यांना निवेदन देणे,एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणे असे विविध मार्ग आहेत मग तरीही बंद पुकारून बाजारपेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांचे नुकसान का करावे..?

 व्यापारी बांधवांनी आपले व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवावे आणि शेतकरी बांधवांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता हे विधेयक आपल्या हिताचे आहे ज्यामुळे शेतकरी समृद्ध होईल आणि बाजारपेठ देखील फुलणार आहे.त्यामुळे शेतकरी व व्यापारी बांधवांनी दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवावे असे नम्र आवाहन त्यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत