गोदावरी डाव्या व उजव्या कालव्या वरून उचल पाण्याची परवानगी द्यावी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गोदावरी डाव्या व उजव्या कालव्या वरून उचल पाण्याची परवानगी द्यावी

कोपरगाव(वेबटीम )  निफाड,कोपरगाव, राहता तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यावरून शेतकऱ्यांना उचल पाण्याची परवानगी द्यावी , अश...

कोपरगाव(वेबटीम)

 निफाड,कोपरगाव, राहता तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यावरून शेतकऱ्यांना उचल पाण्याची परवानगी द्यावी , अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलना चे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कायम दुष्काळी व अवर्षण प्रवण तालुके म्हणून ब्रिटिशांनी नाशिक जिल्ह्यात धरणे बांधून या भागाला जल सिंचनाची सुविधा निर्माण करून दिली कधी काळी कोपरगाव तालुका महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जात होता मात्र वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरण यांच्या मुळे कोपरगाव व राहता तालुक्यात सिंचनाच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आणि या भागातील शेती पडीत पडू लागली.

कधी काळी याच डाव्या व उजव्या पाण्यावर उसाचे मळे फुलले त्याच्या वर या तालुक्यातील राजकारणी कुटुंबाच्या अनेक पिढ्या सुखी झाल्या ब्लॉक पद्धतीने या भागात हक्काचे पाणी मिळत होते. मात्र आता हे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही पूर्वी सारखे शेतकरी देखील ब्लॉक भरून हक्काच्या पाण्यावर हक्क सांगत नाही त्यामुळे पाणी मिळत नाही या कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पाईप, लाईन शेत तळे केले आहेत. मात्र त्याच्या करिता मिळणारे पाणी हे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून घेतले जाते. मात्र त्यामुळे पाण्याच्या हक्काची मागणी नसल्याने या पाण्यावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आपला हक्क सांगितला असून कोपरगाव व राहता तालुक्याचे हक्काचे पाणी डोळ्या देखत मराठवाड्यात निघून जात आहे आणि तालुक्यातील शेतकरी व शेती उध्वस्त होत आहे.

या भागातून जाणाऱ्या कालव्याच्या आजूबाजूला अनेक शेतकऱ्यांनी महागड्या जमिनी खरेदी करून व मोठा खर्च करून शेती पिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असले तरी त्यास कायदेशी व हक्काचा आधार नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना या दोन्ही कालव्यावरून उचल पाण्याची परवानगी मिळाल्यास त्यांचे कडून रीतसर पाणी मागणी अर्ज भरून घेता येऊ शकतात.

तसेच त्यासाठीची योग्य व रीतसर रक्कम शासनाला मिळू शकते आणि हक्काच्या पाण्याची मागणी असल्याने शेतकऱ्यांना ही  योग्य वेळी पाणीपुरवठा होऊ शकतो आणि या भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो मात्र कोपरगाव व राहता तालुक्यातील राजकीय नेते शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा या साठी अशा प्रकारे मागणी करताना दिसत नाही मात्र हाच पाणी प्रश्न अनेक वर्षे तेवत ठेऊन हे नेते व त्यांच्या अनेक पिढ्या सुखी झाल्या आहेत असे या पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत