कोपरगाव शहरात शिवराष्ट्र शिवसेना उपशाखेचे उदघाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहरात शिवराष्ट्र शिवसेना उपशाखेचे उदघाटन

  कोपरगाव(वेबटीम) शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतुन प्रेरणा घेऊन गांव तिथे शाखा घर तिथे शिव...

 कोपरगाव(वेबटीम)

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतुन प्रेरणा घेऊन गांव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हे अभियान अखंड महाराष्ट्र भर सुरू आहे त्याप्रमाणेच कोपरगांव शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.राजाभाऊ झावरे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना शहरप्रमुख मा.श्री.कलविंदरसिंग दडीयाल यांच्या शुभहस्ते तसेच युवा नेते विक्रांत झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराष्ट्र  तरुण मंडळ या शिवसेना उपशाखेचे उद्घाटन तमाम  शिवसैनिक,पदाधिकारी व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

यावेळी शिवराज तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी केले. तसेच शिवसेनेवर निष्ठा ठेवली तर आपणास अनेक उच्च पदावर काम करण्याची संधी मिळेल त्यामुळे आपण एकनिष्ठ राहून काम केले पाहिजे व प्रत्येक घराघरात शिवसैनिक तयार केले पाहिजे असे कलविंदरसिंग दडियाल यांनी शिवराष्ट्र तरुण मंडळाचे संस्थापक संजय बाविस्कर,कार्याध्यक्ष सुमित बोर्डे,अध्यक्ष,विजय सोनवणे, सचिव ऋषिकेश वाघ,उपाध्यक्ष मोनू दळवी,शाखाप्रमुख अंबादास वाघ व उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.


उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे म्हणाले की जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वार्डात नवीन शाखेचे उद्घाटन तसेच नूतनीकरण करणार आहोत. विक्रांत झावरे म्हणाले की शिवराष्ट्र तरुण मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे समस्या सोडविण्यास मदत करू व तसेच कालेमळा व सप्तर्षीमळा या परिसरात घराघरात शिवसेनेचे काम पोहोचणार आहोत.


यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक मुन्नाभाई मंसुरी,उपशहरप्रमुख विकास शर्मा, भूषण पाटणकर,प्रफुल्ल शिंगाडे, संघटक बाळासाहेब साळुंके,नितीन राऊत,सहसंघटक वैभव गिते,विभाग प्रमुख जयेश हस्वाल,विजय शिंदे,मयूर दळवी,शिव व्यापारी सेनेचे योगेश मोरे, शिववाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,विशाल झावरे,तालुकाप्रमुख पप्पू पेकले,उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्रट,किरण कुऱ्हे,शहरप्रमुख जाफर सय्यद,उपशहरप्रमुख राकेश वाघ,प्रवीण शेलार,निशांत झावरे, प्रवीण देशमुख,चेतन सोमवंशी,भूषण वडांगळे,अनिकेत सावजी,सोनू सावजी, अर्चित सावजी,पिनू सावताडकर,शुभम औताडे,किसन बर्डे,अविनाश गुजर,अभी पंडोरे,शुभम पंडोरे,जंगम,कृष्णा बोरावके, अक्षय कातकडे,योगेश जोशी,रितेश राऊत,वेदांत करपे,अक्षय नन्नवरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत