कृषीच्या योजनांत तीस टक्के महिला लाभार्थी शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवणार - ना.दादा भुसे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कृषीच्या योजनांत तीस टक्के महिला लाभार्थी शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवणार - ना.दादा भुसे

  राहूरी(गोविंद फुणगे )      कृषी विभागाच्या दिल्या जाणाऱ्या योजनेत यापुढे 30 टक्के महिला शेतकरी असतील त्या दृष्टीने राज्याचा कृषी विभाग तसे...

 राहूरी(गोविंद फुणगे)

     कृषी विभागाच्या दिल्या जाणाऱ्या योजनेत यापुढे 30 टक्के महिला शेतकरी असतील त्या दृष्टीने राज्याचा कृषी विभाग तसे नियोजन करत असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. ते राहुरी तालुक्यातील मानोरी येथे बोलत होते.             

    राज्यभरातील रिसोर्स बॅकेतील प्रगतशील व कृषीभुषण पुरस्कारप्राप्त  शेतकरयांशी कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्हिडिओ काॅन्फरसव्दारे संवाद साधला.यावेळी आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे प्रमुख  उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या ठिबक सिंचनाच्या  कंपन्या ठिबक संच बसवतील तो संच चार वर्ष सुस्तितीत चालल्या पाहिजे नाहीतर त्या कंपन्यांवर कारवाई देखील करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच कृषी विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आपल्या वडिलांचा शेतकरी असल्याचा दाखला देखील कृषी विभाग ऑनलाइन काढतील आणि शेतकऱ्यांची अडवणूक टाळतील. रेशीम, कृषी , फलोत्पादन विभाग एकत्रीतून रेशीमला चालना देणार आहोत. वन जमीनीला खंदक करण्याचे नियोजन आहे. माती परिक्षणाची सातबारयावर नोंद करण्याचा विचार,कृषी विभाग करत आहे.जे विकेल ते पिकेल याप्रमाणे कृषी विभाग काम करत असल्याचे भुसे यांनी सांगितले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या दिल्ली आंदोलन प्रसंगी उपस्थित पत्रकारांनी मंत्री भुसे यांचे लक्ष वेधले असता भुसे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या संबंधित जे कायदे केले जातील त्या कायद्यात शेतकऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे शेतकर्‍यांचा सहभाग नसला तर या अशा प्रकारे घटना घडतात त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाला महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

     यावेळी रिसोर्स बॅकेतील प्रगतशील शेतकरी धनंजय जोशी (रायगड), पौर्णिमा सवाई (अमरावती), राजेंद्र देशमुख  (बार्शी, सोलापूर), वैशाली पाटील (रावेर,जळगाव ) देवेंद्र राऊत (गोंदिया) उत्तमराव खुणे (कोपरगाव, नगर), मालन राऊत (औसा, लातुर)  यांनी ऑनलाईन संवादात सहभाग घेतला. 

       यावेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख,  डाॅ. दत्तात्रय वने, सबाजीराव गायकवाड, विष्णुपंत जरे, सुनंदा भागवत, रखमाजी जाधव, राजेंद्र गाडेकर,पंचायत समिती सदस्य रविंद्र आढाव  यांच्यासह कृषी सचिव एकनाथ डवले यांनीवेळी  उपस्थित होते. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


*कृषी विभागासह आयोजक उदासीन*

राज्य शासनाच्या कृषी विभागाने रिसोर्स बँकेच्या माध्यमातून राज्यभरातील प्रयोगशील व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना एकत्र करून शेती हिताचा उपक्रम राबवला जात आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र नगर व राहुरीच्या कृषी विभागाला याचे फारसे देणेघेणे नसल्याचे दिसून आले. अनेक प्रयोगशील व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना वगळल्याचे दिसून आले. हा कार्यक्रम कृषीविभागाने जाणीवपुर्वक प्रसिद्धीपासून दुर ठेवला.  रिसोर्स बँकेच्या माध्यमातून आणि कृषीमंत्री भुसे यांच्या पुढाकाराने होणारी प्रगती नगरच्या कृषी आणि आत्मा विभागाला नको आहे काय? उपक्रमाबाबत एवढी उदासीनता कशी?  असा प्रश्न यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.


* जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख तथा राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची कार्यक्रमाला दांडी.*

रिसोर्स  बँकेच्या शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी  मंत्र्यांशी संवाद साधला या कार्यक्रमाच्या बॅनवर मंञी गडाख, मंञी तनपुरे यांची देखील नावे झळकत होती तशी बैठक व्यवस्था देखील करण्यात आली होती. मात्र  राहुरी तालुक्यात होणाऱ्या कृषी मंञ्यांच्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री  शंकरराव गडाख यांच्याह राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याने कार्यकर्तांसह उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त होती.आयोजकांचा काही ताळमेळ हुकलाय की,काय? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

*कृषिमंत्र्यांच्या  कार्यक्रमाची कमालाची गुप्तता, पञकांरांना कार्यक्रमाची भनक नाही.* 

  शासनाचे लाखो रुपये खर्च करून हा कार्यक्रम ठराविक शेतकऱ्यांमध्ये करण्यात आला.तर  जास्त प्रसिद्धी झाली तर गर्दी होईल म्हणून स्थानिक पत्रकारांसह माध्यम प्रतिनिधींना आयोजकांनी माहिती दिली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून ह्या गोष्टी टाळण्यात आल्याचे  एका जबाबदार अधिकाऱ्यांना सांगितलं मात्र तरीही कार्यक्रमस्थळी सोशल डिन्टन्सचा फज्जा उडाल्याने आयोजकाने केलेल्या नियोजनावर पाणी फेरले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत