अगस्ति साखर कारखान्याकडून कागदपत्रांची माहीत देण्यात आली - घुले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अगस्ति साखर कारखान्याकडून कागदपत्रांची माहीत देण्यात आली - घुले

  अकोले(वेबटीम) अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडून तीन सभासदांनी अगस्तितील आर्थिक गोष्टीच्या सबंधीत कागदपत्रांची मागणी केली असून कारखाना प्रशा...

 अकोले(वेबटीम)

अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडून तीन सभासदांनी अगस्तितील आर्थिक गोष्टीच्या सबंधीत कागदपत्रांची मागणी केली असून कारखाना प्रशासनाकडून संबंधित माहिती गुरुवारी (7 डिसेंबर) देण्यात आली असल्याबद्दल कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी कळविले आहे. 

अगस्ति कारखान्यातील सभासद बाळासाहेब देशमुख, दशरथ सावंत, मारुती भांगरे यांनी ही मागणी 26 नोव्हेंबर रोजी पत्र देऊन मागणी केली होती. ही माहिती देण्याची कोणत्याच पद्धतीची  टाळाटाळ अगस्तित प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार सर्व माहीती उपलब्ध असून ती करोनाच्या पार्श्वभूमीवर देण्याबाबत दोन चार दिवस उशीर झाला असेल पण ती देण्याबाबत अगस्तिकडून नकार देण्यात येत असल्याबद्दल चुकीची माहीती व अफवा पसरविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन भास्कर घुले यांनी केले आहे.

    संचालक मंडळतील काही संचालक हे करोना पॅाझिटीव्ह झाल्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली नाही. संबंधीत माहीती देण्यात संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ती दिली जाते. त्यामुळेच ही माहीती सभासद मारूती भांगरे यांनी कारखान्याकडून तातडीने घेऊन जाण्याबाबत मी स्वतःच कळविले असल्याचेही घुले यांनी स्पष्ट केले आहे.. याबाबत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कार्य.संचालक श्री. घुले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत