ग्रामीण भागात क्रिकेट अकॅडमी निश्चितच युवकांसाठी दिशादर्शक- घावटे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ग्रामीण भागात क्रिकेट अकॅडमी निश्चितच युवकांसाठी दिशादर्शक- घावटे

 पानेगाव(वेबटीम) नेवासा तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परीसरातील अमळनेर येथे नुकतीच रॉकस्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून अकॅडमी ची स्थाप...

 पानेगाव(वेबटीम)

नेवासा तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परीसरातील अमळनेर येथे नुकतीच रॉकस्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून अकॅडमी ची स्थापना करण्यात आली यावेळी उद्घाटनाप्रसंगी अंमळनेर तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी राजे घावटे हे बोलत होते.

 त्यांनी सांगितले की, पूर्वी शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी क्रिकेट अकॅडमी असायच्या परंतु आज लोकनियुक्त सरपंच घावटे पाटील तसेच उद्योजक नानासाहेब घावटे पाटील नामदार शंकराव गडाख मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश घावटे यांनी परिसरातील युवकांना कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी हा जो अकॅडमीच्या उपक्रम राबवला निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगून भविष्यात लागणाऱ्या मदतीसाठी तप्तर असल्याचे घावटे सांगितले.

यावेळी सुसज्ज अकॅडमी बाबत सरपंच अच्युत घावटे यांनी माहिती देऊन क्रिकेटच्या खेळाबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रामीण भागातील तरुणांना निश्चितच खूप संधी असल्याचे सांगून आयपीएल क्रिकेट मध्ये सामान्य परिस्थिती असणाऱ्या तरुणांना यातूनच संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गणेश घावटे यांनी सांगितले की, आपल्या परिसरामध्ये क्रिकेट अकॅडमी सुरू झाल्याने निश्चितच परिसरातील युवकांसाठी भूषणावह बाब असून पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी कै. मच्छिंद्र पाटील प्रमुख संस्थेचे संचालक चंद्रकांत टेमक,कैलास बाचकर, विलास बर्डे,केदारनाथ घावटे, संकेत माकोणे, योगेश बर्डे, प्रकाश पुंड, अक्षय रोकडे, संकेत माकणे,सिद्धांत घावटे अनिकेत घावटे, डॉक्टर विक्रम चव्हाण, महेश पवार, माऊली पवार, रोहित धात्रक, दीपक पाडळे, अविनाश रोकडे, ओम घावटे, आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन बाळासाहेब नवगिरे यांनी आभार सिद्धांत घावटे मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत