आरपीआयच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी सिमाताई बोरुडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरपीआयच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी सिमाताई बोरुडे

  राहुरी(वेबटीम)  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी  सिमाताई बोरुडे तर राहुरी तालुका अध्यक्षपदी स्नेहलताई सांगळे तर राह...

 राहुरी(वेबटीम)

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी  सिमाताई बोरुडे तर राहुरी तालुका अध्यक्षपदी स्नेहलताई सांगळे तर राहुरी तालुका उपाध्यक्ष छायाताई दुशिंग यांची निवड करण्यात आली.

सिमाताई बोरुडे यांचे केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवलेयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फुले, शाहु, आंबेडकर, चळवळीमध्ये अंत्यत प्रामाणीकपणे व निस्वार्थ भावनेने बहुजन समाजातील महिलांसाठी कार्य करत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा अध्यक्षपदाची निवडीची घोषणा व पत्र देवुन जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव व जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी केली.

 यावेळी विभागीय प्रमुख भिमराज बागुल,महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक खरात, श्रावण वाघमारे, नवनियुक्त उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा मंदाताई पारखे,राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे आदी उपस्थित होते.

 यावेळी सिमाताई बोरुडे म्हणाल्या कि, पक्षाने मोठी जवाबदारी दिल्याने महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण निष्ठेने काम करून जिल्ह्यात काम करत असतांना महिलांचे संरक्षण व रोजगार या प्रश्नाला प्राधान्य देऊन काम करणार आहे. यावेळी अहमदनगर जिल्हयातील सर्व तालुका अध्यक्ष, व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व अंसख्य कार्यकते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत